नवी दिल्ली : शिवसेना उत्तर प्रदेशात 50 जागा लढणार आहे. उत्तर प्रदेशच्या प्रत्येक विभागात काही आमचे उमेदवार असतील. ही आमची पुढच्या निवडणुकांची तयारी असणार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आज सांगितलं आहे. काल त्यांनी म्हटलं होतं की, उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) हे अयोध्येत (Ayodhya) लढणार अशी चर्चा होत आहे. शिवसेना ही अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
काँग्रेसच्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, गोव्याच्या वातावरणाची एक नशा. तिथे कायम नशा असते. काहींना यशाची धुंदी अजून उतरलेली दिसत नाही. तिथलं काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व जमिनीपासून पाच बोटं वर चालत आहे, असं ते म्हणाले.
कालच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत राऊत म्हणाले की, पंतप्रधानांच्या अनुपस्थितीबद्दल मुख्यमंत्री सचिवालय स्पष्टीकरण देईल. चंद्रकांत पाटील आणि इतर भाजपा नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल आणि त्यांना श्रवण यंत्र पण द्यायची आहेत. चंद्रकांत पाटील हे निरागस आहेत निष्पाप आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की, एखाद्या वेळी पंतप्रधान सुद्धा एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत.. काही वेगळी कामं निघू शकतात. आरोग्यमंत्री होते ना.. त्यांच्याकडे सगळी सूत्रं आहेत.. ते उपस्थित होते तुम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना कमी लेखता का? असं राऊत म्हणाले.
मराठी पाट्यांसंदर्भात राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले की, शिवसेना आपले धोरण कुणाच्या सांगण्यावरून ठरवत नाही. अनेक पक्ष आमच्यातून बाहेर गेले. आमचाच विचार घेऊन गेलेत, असं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. उत्तरप्रदेशात पहिला टप्पा 10 फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अनुक्रमे 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवार, 3 मार्च आणि 7 मार्चला पार पडणार आहे. निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Uttar Pradesh Election 2022 Date: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात होणार मतदान
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम; आधीचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार
- ABP News C Voter Survey : कोरोना, मोदींचा चेहरा की योगींचं काम....निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार प्रभावी, पाहा काय म्हणतेय जनता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह