Sharad Pawar on Dhananjay Munde, Beed : "बऱ्याच दिवसांनी परळीला येणे झाले आहे. अलीकडच्या काळात परळीमध्ये गुंडगिरी वाढलीये. बीड (Beed) जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचं काम केले होते.  दुर्दैवाने आता परिस्थिती बदलली सत्ता आल्यानंतर सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही. काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली. लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे", असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली. परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळीत (Parali) सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 


सत्ता आल्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे लागतात


शरद पवार म्हणाले, एक दिवशी माझ्या मुंबईतील घरी एकदा पंडित अण्णा आणि धनंजय मुंडे आले होते. त्यांनी सांगितले की, आमच्यावर काही अडचणी आहेत. त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. मी म्हणालो कसली मदत? ते म्हणाले, हा माझा मुलगा आहे. याच्याकडे लक्ष ठेवा. .  म्हणून पंडित अण्णा यांच्या सांगण्यावरुन आम्ही लोकांसाठी नेतृत्व दिले. मी त्यांना संधी दिली, पक्षात घेतलं. विरोधी पक्षनेता केलं. त्यांना आमदार केले, मंत्री केले. ऐकेकाळी बीड जिल्ह्याने माझे सर्व आमदार निवडून दिले होते. त्यामुळे तरुण पिढीचं नेतृत्व म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. दुर्दैवाने परिस्थिती बदलली. सत्ता आल्यानंतर पाय जमिनीवर ठेवावे लागतात. त्यांच्या डोक्यात लवकर सत्ता गेली. आज तुमच्या भागात अनेक प्रश्न आहेत. त्याच्या मागे कोण आहे ते लोक सांगतील, असंही शरद पवारांनी नमूद केलं. 



बीड जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचं काम केले होते. दुर्दैवाने आता परिस्थिती बदलली सत्ता आल्यानंतर सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही. काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली.  लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे.


सर्व काही दिले तरी साहेबांना धोका देण्याचे पाप केले


बजरंग सोनवणे म्हणाले, पवार साहेबांनी या मतदारसंघाला आमदार मंत्री पद दिले. सर्व काही दिले तरी साहेबांना धोका देण्याचे पाप केले. सरकार येत असतात आणि जात असतात. तुम्ही भयभीत होऊन काम करू नका. पालकमंत्री म्हणाले होते की, या परळी मतदार संघ भाजप मुक्त करू. बीड जिल्ह्यात सर्वाधिक राष्ट्रवादीची ताकद आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


राणेंनी10 टक्के कमिशन घेतलं, दिल्लीतील उद्योगपतीच्या तक्रारीनंतर मोदींनी राणेंना मंत्रिपद नाकारलं; विनायक राऊतांचा आरोप