Pandharpur Mangalvedha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात (Pandharpur Mangalvedha Vidhansabha Election) आघाडीत बिघाडी झाली आहे. काँग्रेसकडून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल सावंत (Anil Sawant) यांना उमेदवारी दिली आहे. अशातच आता काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना पंढरपूर शहरातून मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर शहरातील काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आज आपला पाठिंबा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर केलाय. विधानसभेला त्यांचेच काम करणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय. 


भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढल्या


पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात बिघाडी झाल्याने येथे मैत्रीपूर्ण लढत होत आहे. काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पंढरपूर शहरातील काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आज आपला पाठिंबा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर केला आहे. विधानसभेला त्यांचेच काम करणार असल्याची घोषणा केल्याने भालके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये पंढरपूर शहर काँग्रेस अध्यक्ष अमर सूर्यवंशी यांच्यासह युवक काँग्रेस सेवा दल व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आज सामूहिक रित्या शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा केली आहे. 


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत


दरम्यान, यापूर्वी मंगळवेढा आणि पंढरपुरातील भालके समर्थक असलेल्या काही नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. आता पंढरपूर शहरातील काँग्रेसने आपला पाठिंबा शरद पवार गटाला जाहीर केल्याने भालके यांना पुन्हा नव्याने कार्यकर्त्यांची जुळणी करावी लागणार आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत असून यात सुरुवातीला मागे आहेत असे वाटणारे शरद पवार गटाच्या तुतारीने पुन्हा एकदा प्रचारात जोरदार मुसंडी घेत आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे . शरद पवार गटाने पंढरपूरमध्ये आपली ताकद लावण्यास सुरुवात केली असून सावंत यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची फौज उभी केली जात आहे.


महत्वाच्या बातम्या:


अनिल सावंतांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, नेमकी काय झाली चर्चा? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात घडामोडींना वेग