Prakash Ambedkar, Solapur : "शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे. दाऊदचा शोध घेताना तिसऱ्या दिवशी दिल्लीत ब्लास्ट झाला. इसिसला माणसं पुरवण्याचे काम जगभरातून झाले. 1990 ते 2000 देशात ब्लास्ट होतं गेले. त्यामुळे शरद पवार आणि दाऊद यांच्याशी भेटीचा काही संबंध आहे का हे तपासले पाहिजे हे मला म्हणायचं आहे", असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुणे आणि सोलापूर दोघात साम्य आहे. दोघांनी सर्वांत जास्त मंत्री पद भोगली. पण एक आणखी साम्य पाणी असून तहानलेले जिल्हे आहेत. सोलापूरला पाण्यासाठी नऊ दिवस थांबणायची गरज नाही असं मी उमेदवार असताना म्हटलेलं होतं. पाच वर्ष झाली नवीन खासदार आले पण परिस्थिती तशीच आहे. दोष एकतर लोकप्रतिनिधीमध्ये आहेत किंवा मतदारांमध्ये आहे, असं मी मानतो. सोलापूर शहर दुर्लक्षित आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर स्वीकारावे.
पुढे बोलताना प्रकाश आंबडेकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तर लाडकी बहीण योजना सारख्या योजना आणण्याची गरज पडणार नाही. टेकस्टाईल उद्योगामुळे सोलापूरचे नावं जगाच्या पाटलावर आहे. सोलापुरात टेकस्टाईल कमिशन ऑफिस असायला हवं. सिंधी मारवाडी समाजाला माझं म्हणणं आहे धंदा वाढवायचा असेल तर भाजप प्रेम कमी करा. महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ इच्छिट असलेल्या उल्लेमा यांनी 44 जागांची मागणी केलेली होती. त्यांना डबल डिजिट देखील जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे उलमा यांच्या या राजकारणाचा मुस्लिम समाजाला नेतृत्व मिळावं यासाठीचा दबाव कमी पडला का? मागच्या पाच वर्षात भाजपने मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांपाठीमागे वंचित आघाडी भक्कम राहिली.
अमित शाह यांचे चॅलेंज मुस्लिमांनानी आता स्वीकारावे. उच्च न्यायालयाने शिक्षणातील पाच टक्के आरक्षण मान्य केलेला होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर अमित शाहला फेल केल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेत संविधान हा प्रश्न होता आणि अंडरकरंट विषय या लोकशाही होता त्यावेळेस वंचितने रान पेटवलं. संविधानवादी आणि लोकशाहीवादी फोर्सेस एकत्र आल्या आणि त्यांनी भाजपला हरवता हरवता थांबवलं. उद्याच्या विधानसभेच्या नंतर 200 मराठा आमदार निवडून जातील असं प्रेडिक्ट केल जातं असल्याने obc ची भीती वाढत आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या