Ram Narayan Passed Away : भारतीय संगीतकार प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण काळाच्या पडद्याआड गेले आहेत. प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचं 9 नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. राम नारायण यांनी वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सारंगी वादक राम नारायण यांनी भारतीय संगिताला जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवणारे ते पहिले भारतीय संगीतकार होते. सारंगी वादक राम नारायण यांना पंडित या नावाने ओळखलं जायचं. राम नारायण यांच्या निधनाने संगीत क्षेत्रासह बॉलिवूड इंडस्ट्रीवरही शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.


प्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचं निधन


राम नारायण (Legendary Sarangi Maestro Ram Narayan Passed Away) यांचा जन्म 25 डिसेंबर 1927 रोजी उत्तर-पश्चिम भारतातील उदयपूरजवळील आमेर गावात झाला. त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथुजी बियावत शेतकरी आणि गायक होते. नथुजी बियावत दिलरुबा वादक (Dilruba Instrument) होते आणि नारायण यांची आई संगीतप्रेमी होती. त्यांचे आजोबा बगाजी बियावत हे आमेरचे गायक होते. राम नारायण आणि त्यांचे आजोबा सगड दानजी बियावत उदयपूरच्या महाराणाच्या दरबारात गायचे. राम नारायण पंडित म्हणून ओळखले जायचे. 






आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता


राम नारायण हे असे भारतीय संगीतकार होते, ज्यांनी सारंगीला भारतीय शास्त्रीय संगीतातील एकल वाद्य म्हणून लोकप्रिय केलं आणि ते पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी सारंगी वादक बनले. त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथुजी बियावतही शेतकरी आणि गायक होते.


पद्मविभूषणने सन्मानित


संगीतकार राम नारायण 1956 मध्ये सोलो कॉन्सर्ट करणारे पहिले कलाकार बनले. त्यानंतर त्यांनी भारतातील अनेक प्रमुख संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले. त्यांनी अनेक अल्बम रेकॉर्ड केले. 1950 च्या दशकात शंकरसोबत दौरा केला. 1964 मध्ये त्यांनी मोठा भाऊ तबला वादक चतुर लाल यांच्यासोबत अमेरिका आणि युरोपचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला. त्यांनी अनेक भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना सारंगी वादन शिकवलं. 2000 च्या दशकात त्यांनी परदेशात अनेक कॉन्सर्ट केले. 2005 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौतवर कोसळला दु:खाचा डोंगर, आजीचं निधन, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...