Shahu Maharaj and Satej Patil कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आज (दि.4) मोठा गोंधळ पाहायला मिळाला. कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी आज अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. यापूर्वीच राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन काँग्रेसने मधुरिमाराजे यांना मैदानात उतरवले होते. दरम्यान, मधुरिमाराजे यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर मोठी नामुष्की आलेली पाहायाला मिळाली. 


मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला, त्यावेळी शाहू महाराज तेथे हजर होते. शाहू महाराजांनी मालोजीराजे यांच्या समोर उमेदवारी अर्ज मागे घ्या, अशा सूचना मधुरिमाराजे यांना दिल्या होत्या. दरम्यान, मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील आणि शाहू महाराज यांच्यामध्ये झालेला संवाद व्हायरल झाला होता. "तुम्ही अगोदरच उभा राहणार नाही, असं सांगायला पाहिजे होतं. माझी फसवणूक केल्यासारखं आहे. पूर्णपणे फसवणूक केल्यासारखं आहे. मग आधीच तुम्ही निर्णय घ्यायला हवा होता. आम्हाला काहीच अडचण नव्हती. महाराज हे चुकीचे आहे. मला मान्य नाही", असं सतेज पाटील शाहू महाराजांना म्हणाले. 


वाद झाल्यानंतर शाहू महाराज आणि सतेज पाटील पुन्हा एकत्र


अर्ज माघारी घेतल्यानंतर शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाले. मात्र, अवघ्या दोन तासांमध्ये शाहू महाराज आणि सतेज पाटील पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले. भूदरगडमध्ये राहुल देसाईंचा काँग्रेस प्रवेश पार पडला. यावेळी शाहू महाराज आणि सतेज पाटील पुन्हा एकदा एका स्टेजवर आले होते. 


धनंजय महाडिक यांची सतेज पाटलांवर टीका 


आजपर्यंत राजघराण्यावर अशा पद्धतीचे भाषा आणि वक्तव्य करण्याचे धाडस कोणीही केलं नाही.  सतेज पाटील स्वतःला सर्वोच्च समजत आहेत. ते आज ज्या पद्धतीने छत्रपती घराण्याला बोलले आहेत, त्यामुळे त्यांचं मन दुखावलेलं असेल. हे वेदनादाई आणि दुःखदायक असल्याने महाराज हे सहन करणार नाहीत. त्यांनी असा निर्णय घेतला असेल तर यात आश्चर्यकारक वाटून घेण्यासारखं काहीही नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Dhananjay Mahadik : सतेज पाटलांच्या घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा, स्वतःच्या सत्तेसाठी छत्रपती घराण्याचा वापर; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल


Satej Patil : 2 वाजून 36 मिनीटांनी मालोजीराजेंचा फोन आला, सतेज पाटलांचे डोळे पाणावले; सर्वकाही सांगितलं