Dhananjay Mahadik on Satej Patil, Kolhapur : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, आज दुपारी घडलेल्या प्रकरानंतर भाजप नेते आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपतींना होते म्हणजे हा छत्रपती घराण्याचा अवमान
धनंजय महाडिक म्हणाले, सतेज पाटील यांच्या दृष्ट आणि घमेंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी घोषित केली. दिल्लीवरून आलेली उमेदवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र काँग्रेस कार्यकर्ते व नगरसेवकांनी त्याला विरोध केला. यामुळे उमेदवारी बदलाची नामुष्की सतेज पाटलांवर आली. उमेदवारीसाठी त्यांना थेट नवीन राजवाड्यावर जावा लागलं. राजकारणासाठी या व्यक्तीने राजघराण्याचा कशा पद्धतीने वापर केला हे दिसतंय. मधुरिमा राजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झालेलं पत्र दुसऱ्या दिवशी आलं आणि वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. पहिली पसंती त्यांची राजू लाटकर होती आणि दुसरी पसंती मधुरिमाराजे छत्रपतींना होते म्हणजे हा छत्रपती घराण्याचा अवमान आहे.
सहा महिन्यापूर्वी गादीचा मान गादीचा मान म्हणून सगळीकडे मत मागत होते
राजू लाटकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी यशस्वी होऊ शकले नाहीत, ही त्यांची तिसरी नामुष्की आहे. शाहू महाराज, मधुरिमा राजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांनी जाऊ उमेदवारी मागे घेतली. हे काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच असं झाला असेल. उमेदवारी मागे घेऊन कार्यालयातून बाहेर येत असताना ते व्हिडिओ हे मन हेलावून टाकणार होते. सहा महिन्यापूर्वी गादीचा मान गादीचा मान म्हणून सगळीकडे मत मागत होते, ते आज महाराजांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्वाच्या भाषेत बोलत होते. सतेज पाटील एवढे मोठे झाले आहेत का? तिथे आता राजघराण्यावर बोलू लागले आहेत. स्वतःच्या सत्तेसाठी छत्रपती घराण्याचा वापर करायचा आणि त्यांना असं अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं. हे सर्व आज कोल्हापूरकरांनी पाहिला आहे, कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत.
आज उत्तरमध्ये झालेल्या एपिसोडचे परिणाम कोल्हापूर दक्षिण करवीर,शिरोळ, हातकणंगले या ठिकाणी असणाऱ्या पाचही उमेदवारांच सुफडा साफ होणार आहे. यामुळे कोल्हापुरात दहा विरुद्ध शून्य असा होईल. कोल्हापूरकरांच्या मध्ये सतेज पाटील यांच्या विरोधात काँग्रेस पक्षावर निर्माण झाला आहे. काँग्रेस हा फोटो नरेटीव सेट करून मतं घेणारा पक्ष आहे. काँग्रेसला आता उतरती कळा लागली आहे. ही त्यांच्या स्वभाव दोषामुळे परिस्थिती आली आहे. मी म्हणेल तोच कायदा या कोल्हापूरचा मालक आहे. काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते माझे नोकर आहेत. हा त्यांचा अविर्भाव होता त्याचा गुरखा पाडण्याचं काम काँग्रेसने केला आहे.
शाहू महाराज छत्रपती राजीनामा देणार आहेत म्हणून सोशल मीडियावरून ऐकायला मिळत आहे. ज्या पद्धतीने शाहू महाराजांचा अवमान झाला आहे तो कोणीही सहन करणार नाही. आजपर्यंत राजघराण्यावर अशा पद्धतीचे भाषा आणि वक्तव्य करण्याचे धाडस कोणीही केलं नाही. सतेज पाटील स्वतःला सर्वोच्च समजत आहेत. ते आज ज्या पद्धतीने छत्रपती घराण्याला बोलले आहेत त्यामुळे त्यांचा मन दुखावलेलं असेल. हे वेदनादाई आणि दुःखदायक असल्याने महाराज हे सहन करणार नाहीत. त्यांनी असा निर्णय घेतला असेल तर यात आश्चर्यकारक वाटून घेण्यासारखं काहीही नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या