मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता, त्यामुळे बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. राज्याचं लक्ष लागलेल्या माहीम मतदारसंघातून शिवसेना (Shivsena) महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले. मात्र, सदा सरवणकर यांनी आपली उमदेवारी कायम ठेवली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगला गाठला होता. मात्र, राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांना भेट नाकारत स्पष्ट संदेश दिला. त्यामुळे, माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झालं आहे. राजधानी  मुंबईत (Mumbai) कुलाबा ते दहीसर एकूण 36 आमदार आहेत, 36 मतदारसंघ आहेत. त्यापैकी, मुंबई शहरमध्ये 10 मतदारसंघ येतात, या 10 मतदारसंघातील उमेदवारांच्या लढती निश्चित झाल्या आहेत. 


मुंबईत प्रमुख उमेदवार कोण असणार आमने-सामने:


धारावी विधानसभा मतदारसंघ 
१) डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड - इंडियन नॅशनल काँग्रेस
२) मनोहर केदारी रायबागे - बहुजन समाज पार्टी
३) राजेश शिवदास खंदारे – शिवसेना


सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ
१) गणेश कुमार यादव - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 
२) कॅप्टन आर तमिल सेल्वन - भारतीय जनता पार्टी 
३)संजय प्रभाकर भोगले - महाराष्ट्र नवनिर्माण सेना


वडाळा विधानसभा मतदारसंघ
१) कालिदास निळकंठ कोळंबकर - भारतीय जनता पार्टी
२) श्रध्दा श्रीधर जाधव - शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
३) स्नेहल सुधीर जाधव - महाराष्ट्र नवनिर्माण सेना


माहिम विधानसभा मतदारसंघ
१)  अमित राज ठाकरे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
२) महेश बळीराम सावंत - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
३) सदानंद शंकर सरवणकर – शिवसेना


वरळी मतदारसंघ
१) आदित्य उद्धव ठाकरे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) मिलिंद मुरली देवरा - शिवसेना
३) संदीप सुधाकर देशपांडे - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
४) अमोल आनंद निकाळजे - वंचित बहुजन आघाडी


शिवडी विधानसभा मतदारसंघ
१) अजय विनायक चौधरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) बाळा दगडू नांदगावकर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना


भायखळा विधानसभा मतदारसंघ
१) मनोज पांडुरंग जामसुतकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) यामिनी यशवंत जाधव - शिवसेना
३) फैयाज अहमद रफीक अहमद खान - एआयएमआयएम


मलबार हिल विधानसभा मतदारसंघ
१) भेरुलाल दयालाल चौधरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) मंगल प्रभात लोढा - भारतीय जनता पार्टी


मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ
१) अमीन पटेल - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२) शायना मनिष चुडासमा मुनोत – शिवसेना


कुलाबा विधानसभा मतदारसंघ
१) अर्जुन गणपत रुखे - बहुजन समाज पार्टी
२) अॅड. राहुल सुरेश नार्वेकर - भारतीय जनता पार्टी
३) हिरा नवाजी देवासी - इंडियन नॅशनल काँग्रेस