सावंतवाडी मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग असे तीन तालुक्यांचा समावेश आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा इतिहास पाहता 1990 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात दोन वेळा निवडून आलेल्या उमेदवाराला तिसऱ्या वेळी मात्र पराभवाचा सामना करावा लागतो. सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते या अगोदर दोन वेळा निवडून आले आहेत. मात्र तिसऱ्यांदा आमदार बनण्याची संधी त्यांना या मतदारसंघातून मिळते का? याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून या मतदार संघात पुन्हा एकदा दीपक केसरकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे दीपक केसरकर 1990 ते 2014 पर्यंतचा इतिहास बदलणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 1990 पूर्वी शिवरामराजे भोसले हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. याच मतदारसंघात प्रतापराव भोसले आणि जयानंद मठकर हे एक वेळा आमदार निवडून आले. या मतदारसंघात दिपक केसरकर हे तिसर्‍या वेळी निवडणुकीला सामोरे जाणार असून त्यांची प्रतिष्ठा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पणाला लागलेली आहे.


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रादेशिक प्रशासकीय विभाग बदलले गेले आणि त्यानंतरच सीमा तयार झाल्या त्यात राज्यातही बदली. 1950 मध्ये प्रजासत्ताक दिन करण्यात आला. त्यावेळी सावंतवाडी संस्थानचा अंमल होता. 1962 साली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची पहिली निवडणूक झाली. त्या वेळी काँग्रेसचे शिवराम सावंत खेमराज भोसले यांना सुमारे 25 हजाराहून अधिक मतदान होऊन ते निवडून झाले. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली. त्यांनीही स्वतंत्र निवडणुका लढवल्या. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मनसेने आपला उमेदवार उभा केला होता. 2014 मध्ये या पंचरंगी लढतीमध्ये सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर 70,902  मते मिळवून विजयी झाले होते. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत 2009 मध्ये मतदारसंघात वेंगुर्ला तालुक्यात समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले असे तीन तालुक्याचे सावंतवाडी मतदारसंघ बनला.

कुडाळ विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे आपला गड परत मिळवणार का?

2019 च्या निवडणुकीत दीपक केसरकर शिवसेनेकडून उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून संजू परब उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादीच्या अर्चना घारे व एम. के. गावडे यांची नावे चर्चेत आहेत.  दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजपकडून राजन तेली यांनी आपल्याला या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यावेळी मनसे आपल्या या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करणार की नाही हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

1990 पासून आतापर्यंतचा इतिहास

1990 आणि 1995 मध्ये काँग्रेसचे प्रवीण भोसले काँग्रेसकडून दोन्ही वेळा निवडून आले.
1999 आणि 2014 मध्ये शिवराम  दळवी हे शिवसेनेकडून निवडून आले होते.
2009 आणि 2014 यावेळी दीपक केसरकर हे दोन्ही वेळा निवडून आले.
1990 ते 2014 पर्यंत इतिहास पाहिला तर दोन वेळा निवडून आलेले उमेदवार पुन्हा निवडून आलेले नाहीत.

1990 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात दोन वेळाच उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे दीपक केसरकर या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहील. गेल्या लोकसभेचे मताधिक्य पाहता दीपक केसरकर हे या मतदारसंघातून निवडून येतील असे मतदानाचे आकडे सांगतात.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ 2009

दिपक केसरकर (राष्ट्रवादी) 63,430
शिवराम  दळवी (शिवसेना) 45,012
प्रवीण भोसले (अपक्ष) 19,364
बाबूराव धुरीजद (धर्मनिरपेक्ष) 1792
सुनील पेडणेकर (बसपा) 1781

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ 2014

दिपक केसरकर (शिवसेना ) 70,902
राजन तेली (भाजप) 29,710
चंद्रकांत गावडे (काँगेस) 25,376
सुरेश दळवी (राष्ट्रवादी) 9,029
परशुराम उपरकर (मनसे) 5,573

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ 2019 इच्छुक उमेदवार

दीपक केसरकर (शिवसेना)
राजन तेली (भाजप)
संजू परब (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
अर्चना घारे (राष्ट्रवादी)
एम. के. गावडे (राष्ट्रवादी)
बबन साळगावकर, सावंतवाडी नगराध्यक्ष (पक्ष ठरलेला नाही)

जाणून घ्या या मतदारसंघाविषयी