छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेला (Manoj Jarange Patil)जातीच्या आरक्षणाशी काहीही देणेघेणं नाही. जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी जहरी टीका कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी केली होती. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आक्रमक भाषेत लक्ष्य केले.


मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे उमेदवार संजय शिरसाठ यांनी तडकाफडकी मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. कालीचरण महाराज मनोज जरागेंना 'राक्षस' म्हटल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान त्याचा फटका उद्या होणाऱ्या मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता मनोज जरांगे आणि संजय शिरसाठ यांच्या भेटीला वेगळं वळण प्राप्त झालं आहे. 


कालीचरण महाराजांशी माझा काही संबंध नाही- संजय शिरसाठ 


दरम्यान, या विषयी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे  प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले होते की, कालीचरण महाराजांशी माझा काही संबंध नाही. मी असा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नव्हता. मनोज जरांगे यांचा मी नेहमीच आदर करतो असंही ते म्हणाले. माझ्या मतदारसंघात कालीचरण महाराजांची सभा झाली. पण त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. ना मी त्यांना भेटलोय, ना मी कुठे उपस्थित होतो, ना माझे बॅनर लागलेत. पण अशा काही बातम्या आल्या तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. जरागे पाटलांचा आणि आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. मराठा आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून आम्ही त्यांना मदत करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मराठा समाजात काही गैरसमज झाला की मी काहीतरी हे घडवतोय तर त्याचा परिणाम वाईट होईल याची जाणीव मला आहे. 


संजय शिरसाट म्हणाले की, मी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी हे वक्तव्य केलं अशा काही बातम्या आल्या. पण मी असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही आणि जरांगे पाटलांविषयी मला नेहमीच आदर आहे.


Kalicharan Maharaj Speech : काय म्हणाले होते कालीचरण महाराज?


कालीचरण महाराज म्हणाले की, आता एक आंदोलन हिंदूमध्ये फूट पाडण्यासाठी झालं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली.  यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस. 


हिंदू लोक मतदानालाच जात नाहीत तर मग राजा कोण येणार तर मुसलमानाचे पाय चाटणारा. हिंदू मतदान करतील तर कट्टर हिंदू राजा होईल. जर तुम्ही पेट्रोल, दरवाढ, भाववाढसाठी मतदान कराल मग राजा कोण बसणार? असा सवाल कालीचरण महाराजांनी विचारला.



ही बातमी वाचा: