Sangli Shirala Vidhansabha Election : सांगली (Sangli) जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघात (Shirala Vidhansabha Election) भाजपमध्ये (BJP) बंडखोरी झाली होती. मात्र, ही बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलं आहे. सम्राट महाडिक (Samrat Mahadik) यांनी बंडखोरी करत अपक्ष भरलेला  अर्ज मागे घेत आहे. या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना ते आपला पाठिंबा देणार आहेत. 


महाडिक सत्यजित देशमुखांना देणार पाठिंबा


शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरला होता. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारच अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शिराळामधून भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष भरला अर्ज भरला होता. मात्र, आज त्यांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलं आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ते सत्यजित देशमुख यांनी आपला पाठिंबा देणार आहेत. 


शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजप कडून सत्यजित देशमुख अशी दुरंगी लढत होणार


शिराळामध्ये आता शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजप कडून सत्यजित देशमुख अशी होणार काट्याची लढत होणार आहे. दोन दिवसापूर्वी बंडखोरी केलेल्या महाडिक बंधूंसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री यांनी वर्षा बंगल्यावर चर्चा केली होती. 


मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासोबत बैठक


शिराळा मतदारसंघामधून सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीसाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून भेटीगाठी सुरू होत्या. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या.  मात्र, शिराळा मतदारसंघांमध्येही भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिराळामध्ये सुद्धा महाडिक यांच्या प्रयत्नांना यश आलं नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं नाराज झालेल्या सम्राट महाडिकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळं शिराळा विधानसभा मतदाहरसंघातील लढत ही तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या जागेवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते. या दोघांनीही सम्राट महाडिक यांच्याशी वर्षा निवासस्थानी बैठक केली. या बैठकीमध्ये अखेर तोडगा काढण्यात यश आलं आहे. आज सम्राट महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मघार घेतला आहे. त्यामुळं शिराळा मतदारसंघात आसि सत्यजित देशमुख विरुद्ध  मानसिंगरावव नाईक असाच सामना होणार आहे.   


महत्वाच्या बातम्या:


Dhananjay Mahadik : खासदार महाडिकांनी एकाचवेळी शिराळा आणि कोल्हापूर उत्तरसाठी डाव टाकला, पण हाती निराशा आली; नाना कदमही शिंदे गटाच्या वाटेवर!