मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवता न आल्याने नव्या सरकारची स्थापनाही झालेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) तसेच भाजपा (BJP) यांच्यात अद्याप मसाधानकारक वाटाघाटी न झाल्यामुळे सरकार स्थापना लांबत चालली आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अस असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी मोठी मागणी केली आहे. 6 डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन आहे. या दिवशी आंबेडकरी अनुयायी दु:खात बुडालेली असते. त्यामुळेच 5 डिसेंबर रोजीचा शपथविधी सोहळा पुढे ढकलावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सचिन खरात यांनी नेमकी काय मागणी केली आहे?
6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या आदल्यादिवशी म्हणजे 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधीचा कार्यक्रम घेऊ नये, अशी मागणी खरात यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालेले आहे. आता विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला लागून सुद्धा आत्तापर्यंत महायुतीने सरकार स्थापन केलेले दिसत नाही, परंतु आता माध्यमातून असे समजत आहे की 5 डिसेंबरला महाराष्ट्र राज्य सरकारचा स्थापन होणार आहे. त्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. 6 डिसेंबर रोजी संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबरच्या अगोदरच आंबेडकरी अनुयायी दुःखात बुडून गेलेले असतात. त्यामुळे 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम करू नये, अशी मागणी सचिन खरात यांनी राज्यपालांकडे केली आहे.
मंत्रिपदावरून चर्चा, म्हणून शपथविधी लांबला
येत्या 5 डिसेंबर रोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात जागावाटपाची तसेच मुख्यमंत्रिपदाची चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र एकनाथ शिंदे हे काही महत्त्वाच्या मंत्रिपदांवर अडून बसलेले आहेत, असा दावा केला जातोय. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी लांबवणीवर पडतोय, असं सांगितलं जात आहे.
Sachin Kharat News Video :
हेही वाचा :
जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला 'वर्षा'वर, महायुतीच्या बैठकीआधीच मोठी घडामोड