BJP Shivsena NCP Probable Minister List मुंबई: राज्यात पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशीच रचना असणार आहे. तर या तिघांसोबत एकूण 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आता समोर येत आहे. महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रिपद (Maharashtra Cabinet) मिळण्यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP Group) कोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे. याचदरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. देवेंद्र फडणवीस 2. गिरीश महाजन3. रविंद्र चव्हाण4. मंगलप्रभात लोढा 5. चंद्रशेखर बावनकुळे6. आशिष शेलार7. नितेश राणे 8. शिवेंद्रसिंहराजे भोसले9. राहुल कुल10. माधुरी मिसाळ11. संजय कुटे12. राधाकृष्ण विखे पाटील13. गणेश नाईक14. पंकजा मुंडे15. गोपीचंद पडळकर
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. उदय सामंत 2. शंभूराज देसाई 3. गुलाबराव पाटील 4. संजय शिरसाट 5. भरत गोगावले 6. प्रकाश सुर्वे 7. प्रताप सरनाईक 8. तानाजी सावंत 9. राजेश क्षीरसागर 10. आशिष जैस्वाल 11. निलेश राणे
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. धनंजय मुंडे2. अदिती तटकरे3. अनिल पाटील4. हसन मुश्रीफ5. धर्मराव बाबा अत्राम6. अजित पवार7. छगन भुजबळ
शपथविधीसाठी जागेची शोधाशोध-
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा कुठे करायचा यासाठी आता प्रशासनातर्फे चाचपणीला सुरूवात झाली आहे. त्यानुसार पहिली पसंती शिवाजी पार्कला असल्याचं समजतंय. मात्र त्याचसोबत रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, राजभवन या पर्यायांचीही चाचपणी सुरू आहे. राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी आणि बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती आहे. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर दिला जातोय. वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांची चाचपणी सुरू आहे. 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर मनसेची सभा झाली नाही. त्यामुळे तिथे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी एक दिवसांची मुदत अजूनही बाकी आहे. त्यामुळे तिथेच शपथविधीची शक्यता अधिक आहे. विलंब झाल्यास आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स किंवा एमएमआरडीए मैदानाचाही प्रशासनाकडून विचार सुरू आहे.