Ratnagiri Vidhan Sabha Constituency Election: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा उदय सामंत (Uday Samant) निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाने रत्नागिरीचा गड राखला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या बाळ माने यांचा रत्नागिरीत पराभव झाला आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी मतदारसंघाचे आमदार हे उदय सामंत आहेत, त्यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा आमदारकी मिळवली. तेव्हापासून रत्नागिरी मतदारसंघात त्यांचंच वर्चस्व आहे.
यापूर्वीच्या निवडणुकीतही उदय सामंत यांचाच डंका
2004, 2009 च्या दोन्ही निवडणुका सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवल्या. यानंतर त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेना फुटीनंतर ते शिंदे गटातून निवडणूक लढवत आहेत. तर ठाकरे गटाकडून त्यांच्याविरोधात बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
1. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
उदय सामंत (शिवसेना)
बाळ माने (उबाठा)
विजयी : उदय सामंत (शिवसेना शिंदे गट)
2. राजापूर विधानसभा मतदारसंघ
राजन साळवी (उबाठा)
किरण सामंत (शिवसेना)
अविनाश लाड (अपक्ष)
विजयी : किरण सामंत (शिवसेना शिंदे गट)
3. गुहागर विधानसभा मतदारसंघ
भास्कर जाधव (उबाठा)
राजेश बेंडल (शिंदे गट)
प्रमोद गांधी (मनसे)
विजयी : भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)
4. दापोली विधानसभा मतदारसंघ
योगेश कदम (शिंदे गट)
संजय कदम (उध्दव गट)
संतोष अबगुले (मनसे)
विजयी : योगेश कदम (शिवसेना शिंदे गट)
5. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ
शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
प्रशांत यादव (शरद पवार गट)
विजयी : शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
हेही वाचा: