Rajapur Vidhan Sabha Constituency Election 2024 : राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत (Kiran Samant) यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी बहुमताने राजापुरात विजय (Chiplun Vidhan Sabha Election 2024 Results) मिळवला आहे. तर त्यांच्या विरुद्ध उभे राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राजन साळवींचा पराभव झाला आहे. सद्यस्थितीत राजापूर मतदारसंघाचे आमदार हे राजन साळवी (Rajan Salvi) होते, ते चौथ्यांदा या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, मात्र 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे.


2019 मध्ये राजन साळवींचा विजय


 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांना 65,433 मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची आकडेवारी ही 50.4 टक्के होती. त्यांना काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी चांगलीच टक्कर दिली होती. लाड यांना 41.3 म्हणजे 53,557 मतं मिळाली होती. 11,876 मतांनी साळवी यावेळी विजयी झाले होते. एकूण 2 लाख 37 हजार 886 मतांपैकी 1 लाख 29 हजार 816 जणांनी मतदान केलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत राजन साळवींना पराभव पत्करावा लागला आहे.


1. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ 


उदय सामंत (शिवसेना)
बाळ माने (उबाठा)


विजयी : उदय सामंत (शिवसेना शिंदे गट)


2. राजापूर विधानसभा मतदारसंघ 


राजन साळवी (उबाठा)
किरण सामंत (शिवसेना)
अविनाश लाड (अपक्ष)


विजयी : किरण सामंत (शिवसेना शिंदे गट)


3. गुहागर विधानसभा मतदारसंघ


भास्कर जाधव (उबाठा)
राजेश बेंडल (शिंदे गट)
प्रमोद गांधी (मनसे)


विजयी : भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)


4. दापोली विधानसभा मतदारसंघ


योगेश कदम (शिंदे गट)
संजय कदम (उध्दव गट)
संतोष अबगुले (मनसे)


विजयी : योगेश कदम (शिवसेना शिंदे गट)


5. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ


शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
प्रशांत यादव (शरद पवार गट)


विजयी : शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)


हेही वाचा:


Chiplun Vidhan Sabha Results 2024 : चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शेखर निकमांची बाजी, मविआचा उमेदवार पराभूत