Muktainagar Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) खऱ्या अर्थाने रंजक ठरली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर हा मतदारसंघ सर्वाच चर्चेचा विषय होता. राज्यातील 288 जागांपैकी मुक्ताई नगर (Muktai Nagar Vidhan Sabha Constituency) मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. ही जागा दीर्घकाळापासून भाजपच्या ताब्यात आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांचा दुसऱ्यांदा पराभव झालाय. तर शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी हा गड राखला आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात चर्चेतला मतदारसंघ आहे. मागील काही वर्ष भाजपच्या तिकिटावर एकनाथ खडसे येथून निवडून आले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात असलेले शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा पराभव केला आहे. रोहिणी खडसे यांचा हा दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. 2019 च्या निवडणुकीत देखील दोन्ही उमेदवार आमने- सामने होते. त्यावेळी देखील रोहिणी खडसे यांचा पराभव झाला होता. यामुळे यंदाच्या निवडणुकीत काहीतरी वेगळे चित्र पाहायला मिळेल असे बोलले जात होते. मात्र मतदारांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
एकनाथ खडसेंनी सलग 6 वेळा निवडणूक जिंकली
महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा जागा ही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राज्यातील एक जागा मानली जाते. येथे भाजपचे सुप्रसिद्ध नेते एकनाथराव गणपतराव खडसे म्हणजेच एकनाथ खडसे यांनी सलग 6 वेळा निवडणूक जिंकली आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ खडसे यांचा हा विजय रथ थांबला. 2019 च्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
गेल्या निवडणुकीत काय झाले?
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ राज्यात नावाने कमी आणि एकनाथ खडसे यांच्या नावाने जास्त ओळखला जातो. 1990 पासून भाजपला या जागेवर कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. 1990 ते 2014 पर्यंत या जागेवर फक्त एकनाथ खडसे निवडणूक लढवत आहेत आणि जिंकत आहेत. पण, 2019 च्या निवडणुकीत असे काही घडले, ज्याची खडसेंनी कल्पनाही केली नसेल. या निवडणुकीत खडसे यांची कन्या रोहिणी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात चंद्रकांत निंबा पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. या निवडणुकीत चुरशीची लढत असतानाही चंद्रकांत निंबा पाटील यांनी रोहिणी यांचा 1,957 मतांनी पराभव केला.
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections/amp वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.
हेही वाचा>>>