Loksabha Election News : सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु झालीय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. अशातच सोलापूर (Solapur) आणि माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांच्यासह शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे कोट्यावधी रुपयांचे मालक आहेत. तर सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते हेदेखील लाखो रुपयांचे मालक आहेत. जाणून

  


कोणाकडे किती संपत्ती?


रणजितसिंह निंबाळकर यांच्या कुटुंबीयांकडे 168 कोटी रुपयांची संपत्ती आहे. नाईक निंबाळकर यांच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफा,  मर्सिडीज, फॉर्च्यूनर गाड्यांची मालकी आहे. तसेच नाईक निंबाळकर कुटुंबियांकडे 77 तोळे सोने असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, निंबाळकर यांच्यावर 30 कोटी रुपयांचं कर्ज आहे. तर दुसरीकडे विरोधी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे.  धैर्यशील मोहिते पाटलांकडे 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर मोहिते पाटलांकडे 897 ग्रॅम सोने आहे. पण धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावावर एकही गाडी नाही. तर मोहिते पाटील यांच्यावर 31 कोटी रुपयांचे कर्ज आहे.  राम सातपुते यांच्याकडे 91 लाख रुपयांची मालमत्ता तर 100 ग्रॅम सोने आहे.  


माढा लोकसभा मतदारसंघातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष


माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha Election) लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात भाजपने रणजितसिंह निंबाळकरांनी पुन्हा तिकीट दिलं आहे. त्यामुळं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन दिवसापूर्वीच मोहिते पाटलांनी अकलूजमध्ये हाती तुतारी घेत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगेचच त्यांची उमेदावारी जाहीर केली. यावेळी मोहिते पाटील कुटुंबियांनी मोठं शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी मोहिते पाटील कुटुंबियांनी रणजितसिंह निंबाळकरांना एक लाख मतांचे लीड देऊ असे सांगतिले होते. त्याप्रमाणे माळशिरस तालुक्यात निंबाळकरांना एक लाखाहून अधिक मतांचे लीड मिळाले होते. 


महत्वाच्या बातम्या:


माढ्याचा तिढा सुटण्याच्या मार्गावर, विशेष विमानाची नागपूरवारी यशस्वी ठरण्याची चिन्हं, फडणवीसांच्या भेटीनंतर उत्तमराव जानकर म्हणाले...