Rajya Sabha Election 2022 Live : राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी; पाहा प्रत्येक अपडेट्स

Rajya Sabha Election Maharashtra Vidhan Parishad Elections : राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. याविषयीच्या महत्वाच्या अपडेट्स...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jun 2022 05:34 AM
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी विजयी उमेदवाराचा कोटा बदलला

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेतील (Rajya Sabha Election 2022) विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर आता विजयी उमेदवाराचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज आहे. 


राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर हा कोटा बदलण्यात आला आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम सारखे लहान पक्ष आता महाविकास आघाडीकडे झुकले असल्याने महाविकास आघाडीसाठी हा बदललेला कोटा फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं आहे. 

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणूक कशी होणार?

  • राज्यसभेसाठी 10 जूनला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 

  • 4 वाजेनंतर मतदान मोजायला सुरुवात होईल.

  • विधानभवनाच्या सेंट्रल हाॅलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल

  • मतदान करणार त्या ठिकाणी बुथ कंपार्टमेंट सहा फुटांचा असणार

  • मतदान करताना सदस्यांना मोबाईल बाहेर ठेवून आतमध्ये जाता येणार

  • प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी आतमध्ये असणार

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान

Rajya Sabha Election 2022 : आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत. 

Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा, आज मतदान

Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या उत्कंठता वाढली असून 10 जून म्हणजेच, आज राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे. 

Rajya Sabha Election Update : मतदानाची परवानगी नाकारली, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राज्यसभेकरता मतदानाची परवानगी नाही

Rajya Sabha Election Update : मतदानाची परवानगी नाकारली, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना राज्यसभेकरता मतदानाची परवानगी नाही

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित काय असते? जाणून घ्या सोप्या शब्दात

Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित काय असते? जाणून घ्या सोप्या शब्दात

वाचा सविस्तर - https://marathi.abplive.com/news/india/presidential-election-2022-know-about-how-is-the-president-of-india-elected-who-can-vote-for-president-election-1067871 

उद्या मोठा भूकंप होईल, भाजपचा उमेदवार निवडून येईल- आमदार रवि राणा

रवि राणा म्हणाले की, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण ते आमदारांना अडीच अडीच वर्षे भेटत नाही


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ते आठवड्यातून दोन वेळा आमदारांना भेटत असत


जरी शरीराने त्यांच्या बैठकीला होते तरी मनाने आणि तनाने ते आमदार भाजप सोबत असतील


उद्या मोठा भूकंप होईल


भाजपचा उमेदवार निवडून येईल


आणि उद्या मोठा भूकंप होईल

सगळं काही ठीक, आमचे उमेदवार निवडून येणार- मल्लिकार्जुन खरगे

सगळं काही ठीक आहे. आमचे उमेदवार निवडून येणार. कोणी काही बोलत असेल खासकरून भाजप तर ते चुकीचे आहे, असं मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटलं आहे.

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात राष्ट्रवादीची बैठक सुरु

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात राष्ट्रवादीची बैठक सुरु, 


बैठकीत विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे ही उपस्थित


तुरुंगात असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी मिळाली नाही तर काय पर्याय यावर आकडेमोड सुरु


बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल पटेल, जयंत पाटील, हसन मुश्रीफ आणि इतर मंत्री उपस्थित

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवाजीराव गर्जे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Vidhan Parishad Election:   राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Vidhan Parishad Election: चुरस वाढली! भाजपचा सहावा उमेदवार घोषित, विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

Vidhan Parishad Election: चुरस वाढली! भाजपचा सहावा उमेदवार घोषित, विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

- सविस्तर वाचा...

https://marathi.abplive.com/elections/vidhan-parishad-elections-maha-vikas-aghadi-and-bjp-6-candidate-shiv-sena-congress-ncp-bjp-ramraje-naik-nimbalkar-eknath-khadse-sadabhau-khot-latest-news-1067819 

Maharashtra MLC Election : भाजपकडून सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांच्या नावाची घोषणा, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज दाखल करणार उमेदवारी अर्ज

Maharashtra MLC Election : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी सहाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 

Vidhan Parishad Live News : राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार


रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कमोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती


विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती


पक्षाकडून अद्याप अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही

Maharashtra MLC Election : राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार: सूत्र

Maharashtra MLC Election : राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती. रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कमोर्तब झाले असूनविधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय?


राज्यसभा निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचं असताना राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार याचा फैसला आज न्यायालयात होणार आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी मतदानासाठी जामीन मिळावा म्हणून अर्ज केलाय. त्याला ईडीनं विरोध केलाय. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. त्याला देशमुख आणि मलिकांचे वकील आज उत्तर देणार असून न्यायालयात त्यावर आज निर्णय अपेक्षित आहे.





 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत उमेदवारी जाहीर नाही


विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत.. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही... उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रामराजे नाईक- निंबाळकरांच्या नावाला विरोध असल्याची राजकीय गोटात चर्चा सुरु आहे... विधान परिषदेच्या सभापतीच्या खुर्चीवर विराजमान असलेले रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत.. त्यामुळं आता रामराजे निंबाळकरांना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे... याशिवाय एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत आहे. बीडच्या संजय दौंड यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी अजित पवार आग्रही असल्याचं कळतं. तर मुंबईतील चेहरा द्यावा यासाठी सुप्रिया सुळे प्रयत्न करत असल्याची माहिती मिळतेय. त्यासाठी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे.





 

विधान परिषद निवडणुकीत तीव्र चुरस


विधान परिषद निवडणुकीत तीव्र चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भाजप सहावा उमेदवार देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. भाजपकडून सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील आणि सदाभाऊ खोत  यांची नावं चर्चेत आहेत. आज उमा खापरे यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील किंवा सदाभाऊ खोत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांची दिली आहे. गुप्त मतदानाच्या आधारावर सहा उमेदवार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. 





 

आमदारांसाठी लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र


राज्यसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या आमदारांसाठी लसीचे दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे मतदानासाठी येताना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत आणण्याचे निर्देश महाविकास आघाडीतील आमदारांना देण्यात आलेत. 





 

Rajya Sabha Election 2022 Live   :मतदानाची प्रक्रिया किचकट असल्यानं सर्वच पक्ष त्यांच्या आमदारांना त्यासाठी प्रशिक्षण


Rajya Sabha Election 2022 Live   : राज्यसभा निवडणूक आता अवघ्या काही तासांवर आलीय आणि प्रत्येक पक्ष मतदानाच्यावेळी दगाफटका आणि चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेतोय. सगळ्याच पक्षांचे आमदार आता पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया किचकट असल्यानं सर्वच पक्ष त्यांच्या आमदारांना त्यासाठी प्रशिक्षण देतायत. त्यामुळे आजही बैठकांचा सिलसिला सुरुच राहणार आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे त्यासाठी डोळ्यात तेल घालून खबरदारी घेतायत. शिवसेनेनंही त्यांच्या आमदारांसाठी हॉटेल ट्रायडेंटमध्ये प्रशिक्षण सुरु केलंय. दुसरीकडे ताज प्रसिडेंट हॉटेलमध्ये भाजपच्या आमदारांचीही आज बैठक होणार असून त्यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित असतील. याशिवाय अपक्ष आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरुच आहेत.





 

पार्श्वभूमी

Rajya Sabha Election 2022 Live Update Maharashtra Politics news Vidhan Parishad Elections  : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2022) उत्कंठता वाढली असून 10 जून म्हणजेच, आज राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एक एक मत महत्त्वाचं आहे. 


राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) आमदारांना व्हिप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना आणि भाजपनं (BJP) आपापल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलं आहे. 


आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत. 


सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार अटळ


विद्यमान संख्याबळानुसार राज्यात भाजपचे दोन आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षातील उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपनेही उर्वरित मतांच्या आणि अपक्षांच्या मतांवर दावा करत कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे.


राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला म्हणजेच, आज होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यातच महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता यावं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. त्यामुळे आपल्याला मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज केला होता. आता त्यांना मतदान करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. 


कशी होणार निवडणूक?



  • राज्यसभेसाठी 10 जूनला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 

  • 4 वाजेनंतर मतदान मोजायला सुरुवात होईल.

  • विधानभवनाच्या सेंट्रल हाॅलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल

  • मतदान करणार त्या ठिकाणी बुथ कंपार्टमेंट सहा फुटांचा असणार

  • मतदान करताना सदस्यांना मोबाईल बाहेर ठेवून आतमध्ये जाता येणार

  • प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी आतमध्ये असणार


राज्यसभा निवडणुकीसाठी विजयी उमेदवाराचा कोटा बदलला


राज्यसभेतील (Rajya Sabha Election 2022) विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर आता विजयी उमेदवाराचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज आहे. 


राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर हा कोटा बदलण्यात आला आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम सारखे लहान पक्ष आता महाविकास आघाडीकडे झुकले असल्याने महाविकास आघाडीसाठी हा बदललेला कोटा फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं आहे. 


अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली


राज्यातल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवारी) मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करत या दोघांनी कोर्टात अर्ज केला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही कोठडीत आहेत.


अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव


निवडणुकीच्या मतदानासाठी परवानगी नाकारल्यानंतर अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सकाळी तातडीने सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना आज होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आशा कायम आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.