राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी'
एबीपी माझा वेब टीम | 11 Dec 2018 02:09 PM (IST)
मुस्लिमबहुल टोंक मतदारसंघात मुस्लिम कार्ड खेळत भाजपने युनूस खान यांना सचिन पायलट यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं, तर बसपतर्फे मोहम्मद अली उमेदवार होते.
मुंबई : काँग्रेसचा युवा चेहरा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या नेतृत्वात पक्षाने राजस्थानात चमकदार कामगिरी बजावली आहे. राजस्थानात सत्तास्थापन करतानाच सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातही विजय मिळवला. मुस्लिमबहुल टोंक मतदारसंघात मुस्लिम कार्ड खेळत भाजपने युनूस खान यांना सचिन पायलट यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं, तर बसपतर्फे मोहम्मद अली उमेदवार होते. मात्र दोन्ही मुस्लिम उमेदवारांना पायलट यांना धोबीपछाड देता आलं नाही. टोंक या विधानसभा क्षेत्रात जवळपास 50 हजार मुस्लिम मतदार आहेत. ही काँग्रेसची व्होट बँक मानली जाते. याशिवाय 30 हजार गुर्जर, 35 हजार एससी आणि 15 हजार माळी समाजाचे मतदार आहेत. 2014 मध्ये भाजपचे सुखबिर सिंग जौनपुरिया आमदारपदी निवडून आले होते.