Mumbai North Central Lok Sabha Election 2024: उत्तर मध्य मुंबई (Mumbai North Central Lok Sabha Election 2024) मतदारसंघात वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. उज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. उज्वल निकम यांनी जवळपास 55 हजारांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या तीन फेरीत उलटफेर करत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North Central Lok sabha) महायुती व भाजपचे उमेदवार  उज्वल निकम (Ujjwal Nikam) आणि महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यात लढत झाली. मतदार संघ हा समीश्र लोकवस्ती असलेला मतदार संघ आहे. या मतदार संघात वांद्रे पूर्वी सारख्या मध्यमवर्गीय झोपडपट्टीधारक मतदारांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे फिल्मस्टार्स राहात असलेल्या वांद्रे पश्चिमेकडचा हायप्रोफाईल मतदारही आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार या ठिकाणी एकूण मतदार हा 17 लाख 21 हजार 250 आहेत. यामध्ये पुरूष - 9 लाख 29 हजार 803 व महिला - 7 लाख 31 हजार 383 व तृतीयपंथी - 64 मतदारांचा समावेश आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2024 (Mumabi North Central Lok Sabha Election Result 2024)  

                               उमेदवाराचे नाव                                                पक्ष                                            विजय कोणाचा?
                                 उज्वल निकम                                              भाजप                                            पराभव
                                 वर्षा गायकवाड                                              काँग्रेस                                              विजय

उत्तर मध्य मुंबई मतदारसंधात पक्षीय बलाबल

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सद्यस्थिती पाहता. यामध्ये विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप व शिंदेंच्या शिवसेनेचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. तर कॉंग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रत्येक एक आमदार आहे. एकूण सहा आमदारांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. सद्यस्थितीत विचार केला तर या ठिकाणी महायुतीची पक्षीय ताकद सर्वाधिक आहे.  

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Mumbai North Central Lok Sabha Voting Percentage 2024)

एकुण टक्केवारी- 51.98

विधानसभानिहाय टक्केवारी-

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ- 56.01 टक्के
चांदीवली विधानसभा मतदारसंघ- 49.43 टक्के
कुर्ला विधानसभा मतदारसंघ- 51.86 टक्के
कलिना विधानसभा मतदारसंघ- 51.58 टक्के
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ- 52.24
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ- 52.17

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

विलेपार्ले विधानसभा आमदार- पराग अळवणी
चांदीवली विधानसभा आमदार- दिलीप लांडे
कुर्ला विधानसभा आमदार- मंगेश कुडाळकर
कलिना विधानसभा आमदार- संजय पोतनीस
वांद्रे पूर्व विधानसभा आमदार- झिशान सिद्दीकी
वांद्रे पश्चिम विधानसभा आमदार- आशिष शेलार

2019 मध्ये काय घडले?

उमेदवार          पक्ष         प्राप्त मते
पूनम महाजन   भाजप       4,86,672  
प्रिया दत्त          काँग्रेस      3,56,667 
नोटा      -                       10,669 

चार लाखांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार-

चार लाखांपेक्षा अधिक मुस्लीम मतदार या मतदार संघात आहेत. दलित आणि मराठी मतांचा टक्काही मोठा आहे. या मतांवर काँग्रेसचा डोळा आहे.  तर पावणे तीन लाख उत्तर भारतीय मतदार इथे आहेत. दोन लाखांच्या आसपास गुजराती, मारवाडी मतदार आहेत. यांच्यावर भाजपची भिस्त आहे.