गेल्या अनेक दिवसांपासून मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत चर्चा सुरु होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत काय भूमिका घेतात याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांसह सामान्यांचेही लक्ष लागले होते. अखेर चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले. अनेक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या याद्यादेखील जाहीर केल्या आहेत. परंतु मनसेने अद्याप लोकसभा निवडणुकीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु आता मनसेने निवडणुकीतून माघार घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्चला मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ठाकरे मोठी घोषणा करतील असे बोलले जात होते. परंतु, आता या मेळाव्यात राज ठाकरे एखाद्या पक्षाला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देतील, असेही बोलले जात आहे.
VIDEO