पर्रिकरांनी गोव्यात इतकी चांगली कामं केलीत, ज्यामुळे विरोधी पक्षदेखील त्यांचे कौतुक करतो. पर्रिकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळच्या लोकांपैकी एक होते. मोदींचं सरकार आल्यानंतर देशाच्या संरक्षणमंत्रीपदाचा विषय निघाला तेव्हा मोदींना एकच नाव सुचलं, ते म्हणजे मनोहर पर्रिकर.
पर्रिकर संरक्षण मंत्री असताना भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय जवानांनी उरी य़ेथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराला बळकटी देण्यासाठी पर्रिकरांनी मोठे योगदान दिले आहे.
वाचा : देशातला पहिला आयआयटीयन जो मुख्यमंत्री झाला,मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय
दरम्यान, आज संध्याकाळी 7 वाजता मनोहर पर्रिकरांची तब्येत खूपच खालावली असल्याचे गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पर्रिकर यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आज सकाळी पर्रिकरांची प्रकृती अत्यंत खालावली होती