पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती.



दरम्यान या लढवय्या नेत्याला विविध स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप अध्यक्ष अमिस शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शशी थरूर, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक राजकीय नेते, कलाकार आणि मान्यवरांनी या लढवय्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
























आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती सायंकाळी 7 वाजता गोवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली होती.  आज सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.
आज सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून मनोहर पर्रीकर यांना झोपूनच राहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सकाळपेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती काहीशी सुधारली होती. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून या नेत्याची मृत्युशी झुंज आज अपयशी ठरली. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.

14 फेब्रुवारी 2018 पासून मनोहर पर्रीकर आजारी होते. प्रथम त्यांना मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल केले होते. तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर 3 मार्च 2018 रोजी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते. तिथून ते 14 जून रोजी परतले होते. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांना अमेरिकेला उपचारांसाठी नेण्यात आले होते. तिथून ते 22 ऑगस्ट रोजी परतले होते. त्यानंतर महिनाभर दिल्लीतील एम्स इस्पितळात उपचार घेऊन 15 सप्टेंबर रोजी ते परतले होते. अडीच महिन्यांच्या कालखंडानंतर गेल्या 2 जानेवारी रोजी ते कार्यालयात रुजू झाले होते. 27 जानेवारी रोजी तिसऱ्या मांडवी पुलाच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थिती लावली होती.