Raj Thackeray on Devendra Fadnavis: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. नाशिक ‘दत्तक’ घेण्याच्या घोषणेपासून ते प्रत्यक्षात अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पांपर्यंतचा लेखाजोखा मांडत राज ठाकरेंनी भाजपच्या आश्वासनांची पोलखोल केली.

Continues below advertisement

Raj Thackeray on BJP: ‘1952 साली जन्मलेल्या पक्षालाही आज दुसऱ्याची पोरं लागतात’

भाजपच्या इतिहासावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “जनसंघाची स्थापना 1952 मध्ये झाली. त्यातून पुढे भाजप जन्माला आला. इतक्या जुन्या पक्षालाही आज स्वतःची माणसं नाहीत. आजही यांना दुसऱ्याची पोरं मांडीवर घ्यावी लागतात,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर खोचक टीका केली. या सभेत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत भाजपच्या राजकारणाची खिल्ली उडवली.

Raj Thackeray: ‘कामं करूनही पराभव झाला, लोक भाजपच्या भुलथापांना बळी पडले’

2012 ते 2017 या कालावधीत नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. “पाच वर्षांत इतकी कामं करूनही जनतेनं आम्हाला पराभूत केलं. भाजपच्या भुलथापांना लोक बळी पडले, याचं वाईट वाटतं,” असं सांगत त्यांनी त्या काळातील कामगिरीची आठवण करून दिली.

Continues below advertisement

Raj Thackeray on Devendra Fadnavis: ‘नाशिक दत्तक घेतो’ म्हणणारा बाप पुन्हा फिरकलाच नाही

2017 च्या महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊन दिलेल्या आश्वासनांवर राज ठाकरेंनी घणाघात केला. “2017 मध्ये फडणवीस नाशिकमध्ये प्रचाराला आले. सत्ता द्या, मी नाशिक दत्तक घेतो, असं म्हणाले. नाशिककर त्या शब्दांना भुलले. पण दत्तक घेतो म्हटल्यानंतर तो बाप पुन्हा कधी नाशिककडे फिरकलाच नाही,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली.

Raj Thackeray on Devendra Fadnavis: फडणवीसांच्या आश्वासनांची यादीच वाचून दाखवली

राज ठाकरे यांनी सभेत फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांची भलीमोठी यादी वाचून दाखवत भाजप सरकारला सवालांच्या कचाट्यात पकडले. “मी फक्त प्रकल्पांची आणि योजनांची नावं वाचतो. तुम्हीच सांगा, यातली किती आश्वासनं पूर्ण झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित जनतेला केला. नाशिक निओ मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका–नाशिक उड्डाणपूल, नाशिक बाह्य रिंग रोड, नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, इगतपुरी येथे आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, या प्रत्येक प्रकल्पावर उपस्थित जनतेनं “एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही” असा प्रतिसाद दिला.

Raj Thackeray on Tapovan Tree Cutting: ‘मनसेच्या काळात कुंभमेळा, एकही झाड तोडले नाही’

दरम्यान, नाशिकमध्ये 2012 साली मनसेच्या सत्तेत झालेल्या कुंभमेळ्याचा दाखला देत राज ठाकरे म्हणाले, “तेव्हा मनसेची सत्ता होती. उत्तम नियोजन झालं. साधू-संत समाधानी होते. सर्व पक्षांनी सहकार्य केलं. विशेष म्हणजे एकही झाड न तोडता कुंभमेळा झाला,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तपोवनातील वृक्षतोडीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला. “आधी तिथे कुंभमेळा घ्यायचा, मग झाडं तोडायची आणि नंतर हव्या त्या उद्योगपतीच्या घशात जमीन घालायची, हा सगळा यांचा डाव आहे,” असा आरोप करत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. 

आणखी वाचा 

Raj Thackeray on Ladki Bahin Yojana: राज ठाकरेंनी एका वाक्यात लाडकी बहीण योजनेच्या मर्यादा दाखवून दिल्या, म्हणाले, 1500 रुपयांना....