ED Raid on Sand Smuggling: राज्यभरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अंमलबजावनी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) कोट्यवधींच्या अवैध वाळू उत्खनन घोटाळ्यासंदर्भात नागपूर (Nagpur)आणिभंडाऱ्यात (Bhandara) वाळू माफियांवर (Sand Smuggling) छापे घातलेत. भंडाऱ्यात दोन वाळू व्यावसायिकाच्या घरावर छापेमारीनंतर ED ने 12 तास चौकशी केलीय. यात महत्वाचे कागदपत्र, दोन मोबाईल, नोंदणी रजिस्टरसह 4.50 लाखांची रोकड सापडली असल्याचीमाहितीआहे. सोबतच दोन पोकलँड, दोन जेसीबी, फॉर्च्यूनरला देखीलजप्तकरत सील ठोकले आहे.
तरदुसरीकडे सकाळपासूनच नागपूरच्या सावनेरसह पाटणसावंगी आणि खापा येथे एकाचवेळी छापे टाकण्यात आले. वाळू तस्करी व बनावट रॉयल्टी प्रकरण संदर्भात हे छापे असल्याची माहिती आहे. 2022 मध्ये नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात कठोर मोहीम हाती घेतली होती. तेव्हा काही प्रकरण नागपूर शहर पोलिसांनी वाळू माफिया विरोधात नोंदवले होते. त्याच प्रकरणाच्या तपासातून पुढे मनी लॉन्ड्रिंगचा संशय बळावल्याने पोलिसांनी ते प्रकरण ईडीकडे सोपवले होते.
Sand Smuggling : वाळू तस्करीचे संपूर्ण नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता
दरम्यान, शुक्रवारी त्याच अनुषंगाने ईडीने नागपुरात वाळू माफिया आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचे घर कार्यालय आणि इतर ठिकाणांवर छापे घातले. या छाप्यात ईडीच्या टीमने अवैध वाळू उत्खननाच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे तपासण्याच्या दृष्टीने काही दस्तऐवज, डिजिटल उपकरणे आणि अन्य महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आता ईडीच्या या कारवाईमुळे नागपूर जिल्ह्यात वाळू तस्करीचे संपूर्ण नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुढील दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे ईडीने केलेल्या कारवाई मधील बहुतांश जण राज्याच्या एका माजी मंत्री यांच्या संपर्कातील असल्याचे बोलले जात आहे.
Bhandara Crime : भंडाऱ्यात वाळू व्यावसायिकाच्या घरावर छापेमारी,12 तास चालली चौकशी
महाराष्ट्राच्या नद्यांमधून वाळूचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून ती वाळू मध्यप्रदेशातून आणल्याचे बनावट कागदपत्राच्या माध्यमातून त्याची नागपूरमध्ये विक्री करण्यात येत होती. यात महाराष्ट्र सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्या जात असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांनी या वाळू माफियांच्या टोळीचा पर्दाफास केला होता. या कारवाईत मध्यप्रदेशच्या भोपाळमधून एकाला आणि अन्य पाच जणांना नागपुरातून अटक केली होती. या कारवाईनंतर 100 पेक्षा अधिक वाळू माफिया अंडरग्राउंड झाले होते. या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीसाठी आता हे प्रकरण ईडीकडे सोपविण्यात आलं आहे. ईडीनं पुन्हा एकदा वाळू व्यवसायाशी जुळलेल्या व्यक्तींच्या प्रतिष्ठान किंवा घरांवर छापेमारी केली आहे.
Bhandara : भंडारा जिल्ह्यातील आजपर्यंतची ED ची ही पहिलीचं मोठी कारवाई
अशातच, भंडाऱ्याच्या मध्यप्रदेशच्या सीमेवरील तुमसर तालुक्यातील डोंगरी बुद्रुक येथील रोहित मिरचूले आणि अजय गहाणे यांच्या दुकानावर आणि लोभी येथील त्यांच्या घरावर ईडी च्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. सुमारे 12 तास ही चौकशी चालली. यात रोहित मिरचूले यांच्याकडे ED च्या अधिकाऱ्यांना फारसं काही सापडलं नाही. मात्र, अजय गहाणे यांच्याकडे काही महत्त्वाच्या नोंदी असलेले तीन रजिस्टर, दोन बँकांचे खाते पुस्तक, घर आणि शेती खरेदीचे कागदपत्र, आणि 4.50 लाखांची रोख रक्कम, दोन मोबाईल हे महत्वाचे पुरावे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत सोबत नेले. तर, दोन पोकलँड मशीन, दोन जेसीबी, एक फॉर्च्यूनर हे वाहन ताब्यात घेत त्यांना सील ठोकले. दोन वाहनांमधून आलेल्या या पथकात मुंबई ED कार्यालयाचे असिस्टंट डायरेक्टर अंकुर शर्मा यांच्यासह सीआरपीएफचे दोन शस्त्रधारी जवान आणि ED कार्यालयाचे सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश होता. भंडारा जिल्ह्यातील आजपर्यंतची ED ची ही पहिलीचं मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे.
इतरमहत्वाच्याबातम्या