Horoscope Today 10 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 9 जानेवारी 2026, आजचा वार शनिवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज खूप व्यवहारी आणि हिशोबी वृत्तीने वागाल याचे फायदे तोटेही सहन करावे लागतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होईल, नवीन जागेसंबंधी केलेले व्यवहार यशस्वी होणार नाहीत
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन जास्त उपयोगी पडेल, वैवाहिक जीवनात थोडे वाद निर्माण होतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कुठेही सामंजस्याचे धोरण स्वीकारा, काही अनपेक्षित खर्चांना तोंड द्यावे लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, आर्थिक तंगीला सामोरे जावे लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज तरुणांनी अति आत्मविश्वास न बाळगता आपले काम करावे, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांनी अहंकार ठेवू नये कोणताही निर्णय पटकन घेतला नाही तर, संधी दार ठोठावून निघून जाईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज एखाद्या वेळी चुकीचे निर्णय घेतले जातील, वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज शांत डोके ठेवले तर सर्व गोष्टी सुसह्य होतील, घरापासून दूर प्रवासाचे योग येऊ शकतात
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज परदेश गमनाच्या संधी येतील, घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज रूढी परंपरा जुगारून देण्याकडे कल राहील, आधुनिक गोष्टींचे आकर्षण वाटेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज स्थावर इस्टेटिंमधून पैसा मिळण्याची शक्यता आहे, सर्वांना सामावून घेऊन पुढे जाल.
हेही वाचा
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा भाग्याचा! पैसा, नोकरी, प्रेम जीवनात मोठं वळण? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
