Ajit Pawar : माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या, पुरंदरचा (Purandar) बारामतीसारखा (Baramati) विकास करुन दाखवतो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. ते पुरंदर तालुक्यातील सासवड इथं आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला तर येणाऱ्या बजेटमध्ये गुंजवणी धरणाचे पाणी आणण्यासाठी निधी मंजूर करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. एकतर मी शब्द फार जपून देतो, दिला तर तो पूर्ण करतो असेही ते म्हणाले. 
 
पुरंदर उपसा सिंचन योजना व्यवस्थित चालली तर सोमेश्वर कारखाना चागलां चालेल असे अजित पवार म्हणाले. निवडणुका आल्या की, वीज द्यायचे पण आता कायमस्वरुपी योजना सोलर पंप शेतकऱ्याना दिली जाणार असल्याचे अजित पवार म्हणाले. काही भागात बिबट्या फिरत आहेत, म्हणून दिवसा पंप सुरु राहावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. 


नेतृत्वात धमक असली की कामं होतात


अनेक लोक येतात जातात,नारळ फोडले जातात पण काही होत नाही. अहमदनगरमध्ये निळवंडे धरण मी सुरू केल्याचे अजित पवार म्हणाले. नेतृत्वात धमक असली पाहिजे. काम करुन घेण्याची हिंमत असली पाहिजे. अधिकारी काम होत असलं की काम करुन देतो असेही अजित पवार म्हणाले. रिंग रोड जमिनी ताब्यात आल्या आहेत. त्याचे पण काम सुरु आहे. त्यानंतर रेल्वे पण फिरविणार आहे. यामुळं आपला सगळ्याचांच मोठा फायदा होणार आहे. विकास कामांसाठी पैसे कुठून आणणार? पैशाचा सोंग आणता येत नाही. आपले उद्योगपतींसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळं आपण पैसे आणतो असे अजित पवार म्हणाले.


मी केलेली काम सांगण्याची वेळ आलीय


अनेक कामं सुरू आहेत. रस्ते, आरोग्य याचं काम सुरू असल्याचे अजित पवार म्हणाले. मी केलेली काम सांगण्याची वेळ आली आहे म्हणून सांगत आहे. नाहीतर अनेक कामं झाली पण कधी  मी सांगत नव्हतो. लोकासारखी जाहिरात करत नव्हतो असेही अजित पवार म्हणाले. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वर्गीय यशंवतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालतो. विकास कामे करायची आहेत पण माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या,अनेक विकास कामे करू अशी ग्वाही अजित पवारांनी दिली. आमचे विरोधक निव्वळ चुकीचा प्रचार करत आहेत, दिशाभूल करत असल्याचे अजित पवार म्हणाले. भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित येवून सगळ्यांनी काम करा. या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन काम करा. तुम्ही सर्वांनी साथ द्या असेही अजित पवार म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


Ajit Pawar on Supriya Sule : फक्त मोदी-शाहांवर टीका करुन चालत नाही, निधीही आणावा लागतो, अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल