नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या पंजाब दौऱ्यावेळी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांना मिठी मारली. आमच्यामध्ये कोणताही वाद नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राहुल गांधींनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्यांच्या निर्णयामागे आम्ही सर्वजण उभे राहू असंही ते म्हणाले. त्यामुळे किमान राहुल गांधींच्या समोर तरी या दोन्ही नेत्यांची दिलजमाई झाल्याचं चित्र दिसून आलं.
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, "मला कोणत्याही पदाची आशा नाही. राहुल गांधींनी योग्य व्यक्तीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावा. त्याच्यामागे आम्ही सर्वजण एकदिलाने उभे राहू. पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे. आपल्यात आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्याच कोणताही वाद नाही."
पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावरुन विविध चर्चा सुरू आहेत. पंजाबमध्ये विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सर्व्हे काय सांगतो?
एका सर्व्हेनुसार पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर 21 टक्के लोकांनी सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. 27 टक्के लोकांनी दोघांच्याही नावाला नकार दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी याबाबत माहित नसल्याचे उत्तर दिले आहे. दोन्ही नेते मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नाबाबत विचारल्यावर टाळाटाळ करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- पंजाबमध्ये चन्नी की सिद्धू कोण असणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? पाहा काय म्हणाले राहुल गांधी
- Punjab Elections 2022 : पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्या विरोधात विक्रम सिंह मजिठिया लढवणार निवडणूक ; अकाली दलाचा मोठा निर्णय
- पंजाबमध्ये काँग्रेसने चन्नी की सिद्धू कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी? पाहा सर्वेतून काय आले समोर...