Punjab Assembly Election 2022: आम आदमी पक्षांने पंजाब निवडणुकीसाठी त्या पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला आहे. भगवंत मान हे आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचं आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे. पंजाबमधील 21 लाखपेक्षा जास्त लोकांनी यावर आपलं मत व्यक्त केलं असून त्यापैकी 93 टक्के लोकांनी भगवंत मान यांच्या नावाला पसंती दिल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. 


पंजाबच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष पूर्ण ताकतीने उतरला असून सी व्होटर सर्व्हेमध्ये आप सर्वात मोठा पक्ष असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच पंजाबची निवडणुक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आणि बहुमत मिळवायचंच असा चंगच अरविंद केजरीवाल यांनी बांधला आहे. त्यामुळेच भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्यात आलं आहे. 


कोण आहेत भगवंत मान?
आम आदमी पक्षाचे पंजाबचे प्रमुख असलेले भगवंत मान हे संगरुर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. आपल्या भाषणाच्या वेगळ्या शैलीमुळे पंजाबमध्ये ते लोकप्रिय आहेत. पण ते नेहमी दारूच्या नशेत असतात असा आरोप अनेकवेळा करण्यात आला आहे. तरीही त्यांची लोकप्रियता काही कमी नाही. 


पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली
पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्याने 14 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक आता  20 फेब्रुवारीला होणार आहे. संत रविदास यांची जयंती असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मतदानाची तारीख पुढे ढकलली असली तरी 10 मार्च रोजी ठरल्यानुसार मतमोजणी होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :