Assembly Election 2022 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सध्या देशात सुरू आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यातील राजयकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 10 फेब्रुलारीला पार पडला होता. त्यानंतर आता पुढच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया 14  फेब्रुवारीला पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 55 जागांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. तसेच उत्तराखंड आणि गोव्यामध्ये देखील आज प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. कारण तिथेही 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.


उत्तर प्रदेशमध्ये 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्याचबरोबर गोवा आणि उत्तराखंडमध्येही 14 फेब्रुलारीला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे तेथे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. तेथील प्रचारच्या तोफा आज थंडावणार असून, दिग्गजांच्या सभा आज शेवचट्या दिवशी होणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तराखंड आणि यूपीमध्ये मतदारांना संबोधीत करणार आहेत. दुपारी 1.30 वाजता उत्तराखंडच्या रुद्रपूरमध्ये पंतप्रधान सभेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता त्यांना यूपीला पोहोचायचे आहे. जेणेकरून ते यूपीच्या कन्नौजमधील रॅलीत सहभागी होऊ शकतील. उत्तराखंडच्या शेवटच्या प्रचारात पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह देखील आज विरोधकांवर हल्लाबोल करणार आहेत. डेहराडूनशिवाय अमित शाह धनौल्टी, सहसपूर, रायपूर आणि नंतर हरिद्वारमध्ये जनसंपर्क अभियान करणार आहेत. त्याचवेळी योगी आदित्यनाथ आज यूपीची सीमा ओलांडून उत्तराखंडमध्ये पोहोचणार आहेत. 


प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तराखंडहून परतल्यानंतर योगी यूपीमध्ये तीन सभा घेणार आहेत. सहारनपूरच्या बेहट आणि देवबंदसोबत योगी अमरोहाच्या हसनपूरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. दुसरीकडे, यूपीमध्ये योगी सरकारला आव्हान देणारे अखिलेश यादव आज तीन ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. अखिलेश यांचा बदायूंमधील दोन आणि शाहजहानपूरमधील एका जागेसाठी प्रचाराचा कार्यक्रम आहे.


प्रियांका गांधी आज उत्तराखंडमध्ये 


यूपीमध्ये मुलींनी सोबत घेऊन प्रियंका गांधी निवडणूक लढवत आहेत. त्या आज प्रचारासाठी उत्तराखंडच्या सीमेवर दाखल होणार असून तीन ठिकाणी प्रचार करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता प्रियंका गांधी खातिमा येथील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर दुपारी 1 वाजता हल्दवानी विधानसभेच्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. यानंतर, त्या दुपारी 2:35 वाजता श्रीनगर विधानसभेत पोहोचतील.