भोपाळ : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी रविवारी भोपाळमधील एका प्रचाराच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी गडकरी यांना मध्यमांच्या प्रतिनिधींनी तु्म्ही पंतप्रधानपदाचे दावेदार आहात का? असा प्रश्न विचारला. यावर गडकरी म्हणाले की, पंतप्रधान पद हा माझा अजेंडा नाही.


गडकरी म्हणाले की, मी याआधीदेखील अनेकदा स्पष्ट केले आहे, पंतप्रधानपद हा माझा अजेंडा नाही. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या पदाचे उमेदवार आहेत आणि यावेळीदेखील तेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील.

VIDEO | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गाजलेलं भाषण | हॅलो माईक टेस्टिंग | चंद्रपूर | एबीपी माझा



गडकरी यांनी यावेळी दावा केला आहे की, भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा यावेळी जिंकेल. महामार्ग, जलमार्ग, कृषी क्षेत्रासह केंद्र सरकारने विविध क्षेत्रात खूप कामं केली आहेत. त्यामुळे विकास हा आमच्या पक्षाचा निवडणुकीचा अजेंडा आहे. त्याच्या जोरावर आम्ही निवडणूक लढत आहोत. देशाला सुपर इकोनॉमिक पॉवर बनवण्यासाठी आम्ही कामं करत आहोत.

UNCUT | पन्नास वर्षात कॉंग्रेसला जमलं नाही ते पाच वर्षात केलं- नितीन गडकरी | पैठण | एबीपी माझा



गडकरी म्हणाले की, काँग्रेसने 50 वर्षांच्या कार्यकाळात जितकी कामं केली आहेत, तितकी कामं आम्ही या पाच वर्षात केली आहेत. दहशतवाद संपवण्यासाठी भाजप सरकारने जोरदार पावलं उचलली आहेत. मोदींच्या नेतृत्वाने देशाला दिशा दिली आहे.