मुंबई : आजचा विजय हा घमंडिया आघाडीसाठी इशारा असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. आम्ही लोकांसाठी जे काही करु त्यावर काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे त्यामध्ये काहीतरी ख्वाडा घालतात. त्यामुळे काँग्रेस आणि अशा सर्व पक्षांनी आता तरी सुधारावं, नाहीतर जनता तुम्हाला साफ करुन टाकेल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली. काँग्रेसचा सुपडा साफ झालाय कारण जिंकण्यासाठी आम्ही कोणतीही खोटी आश्वासनं देत नाही, म्हणून काँग्रेसचा सुपडा साफ झालाय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. चार राज्यांमध्ये (Assembly Election Result) दणदणीत विजय झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाजप (BJP) मुख्यालयातून जनतेला संबोधित केलेय यावेळी त्यांनी काँग्रेससह (Congress) इंडियाच्या आघाडीवर देखील जोरदार निशाणा साधला. मिनी लोकसभा असं समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं स्पष्ट झालंय.


देशविघातक शक्तींचा पराभव करायचा आहे - पंतप्रधान मोदी 


जे देशविघातक कृत्यांचा विचार करत असतील, अशा शक्तींचा आपल्याला पराभव करायचा आहे. या निवडणुकीत जनतेने भ्रष्टाचार करणाऱ्यांना संदेश दिला आहे. भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला देखील जनतेने समर्थन दिलं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 


पंतप्रधान मोदींचा काँग्रेस सल्ला


अशा शक्तींना अजिबात प्रोत्साहित करुन नका ज्या देशविरोधी कारवायांना प्रोत्साहित करेल, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला दिला. विकासाला काँग्रेसकडून सातत्याने विरोध होत असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 


मंदीचा भारतावर कोणताही परिणाम नाही - पंतप्रधान मोदी 


काही लोक म्हणत होते जागतिक मंदीचा परिणाम भारतावर होईल. पण त्याचा कोणताही परिणाम भारतावर झाला नाही. आज भारतात प्रत्येक क्षेत्रात विकास होत आहे. चारही दिशांना एक्सप्रेसचं जाळं तयार होतोय, असं म्हणत अनेक विकास कांमांचा पाढा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी वाचला. 


'तुमचा स्वप्न पूर्ण करणं हाच माझा संकल्प'


तुमचं स्वप्न पूर्ण करणं हाच माझा संकल्प आहे. त्यासाठी मी आणि भाजप काम करतोय. आज भारताने डिजीटल युगात देखील प्रगती केलीये. भाजप सरकारने 4 कोटी लोकांना पक्क घरी दिली, त्यामुळे तुमचा विकास करणं हेच आमचं ध्येय आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 


हेही वाचा : 


PM Modi : आजचा विजय ऐतिहासिक पण तुमच्या घोषणा तेलंगणापर्यंतही पोहचल्या पाहिजेत, भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदींचे संबोधन