Poonam Mahajan on Majha Katta : भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी आज (दि.8) 'माझा कट्टा'वर ठाकरे आणि महाजन घराण्यातील संबंधाबाबत भाष्य केलं आहे. "भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती तुटली असली तरी प्रमोदजी आणि बाळासाहेबांचं असलेलं प्रेम हे राजकारणाच्या पलिकडे होतं. आताही माझे उद्धवजी आणि रश्मी वहिनींबरोबर चागंले संबंध आहेत. ते राजकारणाच्या पलिकडे आहे. ते जेव्हा दु:खातून जातात , तेव्ही मी त्यांच्याशी बोलते. मी जेव्हा दु:खातून तेव्हा ते माझ्याशी बोलतात. शिवाय सुखाच्याही गोष्टी शेअर केल्या जातात", असं म्हणत पूनम महाजन यांनी ठाकरे आणि महाजन यांच्यातील असणाऱ्या नात्याबाबत भाष्य केलं. 


तेव्हा उद्धव ठाकरे 12 दिवस दररोज 2-3 तास रुग्णालयात आमच्यासोबत थांबायचे


पूनम महाजन म्हणाल्या, माझे वडिल जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, पूर्ण देश त्यांना भेटायला आला. उद्धवजी लंडनला निघत होते, त्यांनी फ्लाईट कॅन्सल केली. 12 दिवस जसा घरातला माणूस असतो, त्याप्रमाणे उद्धवजी संध्याकळी 5-6 वाजता यायचे. वरती 15 व्या मजल्यावर बसायचे. तीन तास घरातील माणूस जसा सर्वांना अटेन करतो. तसं ते सर्वांशी बोलायचे, विचारायचे. मग रात्री जायचे. माझ्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचे पॉलिटिकल वार प्रतिवार याबाबत लिहलं जायचं. पण त्याच्या पुढं जाऊन काही असतं की नसतं? संबंध असतात. सध्या जे संबंध ताणले गेलेत ते भाजप आणि ठाकरेंमध्ये ताणले गेलेत आमच्यामध्ये नाहीत. याला मी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना धरते.


माझ्यासाठी त्यांना दु:ख वाटलं आणि त्यांनी खुलेपणाने व्यक्त केलं तर हे वाईट आहे का?


आम्हा दोघांना (उद्धव ठाकरे आणि पूनम महाजन) वाईल्ड लाईफ आवडतं. आम्हा दोघांना कॉफीवर गप्पा मारायला आवडतात. आम्हाला आमच्या वडिलांविषयी बोलायला आवडतं. मग आम्ही एकमेकांशी बोलत नाही का? मला ते उदाहरण सांगायचे प्रमोदजी मला असं बोलले होते. कधी ते चिडलेही होते. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही संस्कृती सोडून नेहमी भाष्य केलं तर चालतं नाही. तिकीट कापल्यानंतर माझ्यासाठी त्यांना दु:ख वाटलं आणि त्यांनी खुलेपणाने व्यक्त केलं तर हे वाईट आहे का? याच्यातून दिसतं की, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अजूनही जिवंत आहे. मला वाटतं मी त्या लोकांचा सन्मान ठेवते, असंही पूनम महाजन म्हणाल्या. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Pankaja Munde on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे अमित शाहांचे संकेत, पंकजा मुंडेंची बोलकी प्रतिक्रिया