Pankaja Munde on Devendra Fadnavis, Ahmednagar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी ताकदीने निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर कोम मुख्यमंत्री होईल? याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रि‍पदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवाराबाबत भाष्य केलं आहे. "मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे", असं अमित शाह म्हणाले होते. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. 


अमित शाह काय काय म्हणाले? 


20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचे अमित शाह म्हणाले आहेत. सभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.






सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे - पंकजा मुंडे 


अहिल्यानगरच्या राहुरी मतदार संघातील शिराळ चिचोंडी येथे भाजपने नेत्या पंकजा मुंडे यांची प्रचार सभा पार पडली. राहुरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले आणि शेवगाव पाथर्डी येथील उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेसाठी भाजप कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे संकेत दिले आहेत, यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी तो सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Aditya Thackeray: बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या म्हणणाऱ्या नारायण राणेंवर आदित्य यांचा पलटवार