Nilanga Vidhan Sabha constituency : विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. आज आपण निलंगा विधानसभा मतदारसंघाची (Nilanga Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar) हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अभय साळुंखे (Abhay Salunkhe) निवडणूक लढवत आहेत. 


निलंगा विधानसभा मतदारसंघातीव लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रसचे अभय साळुंखे यांच्यात लढत होत आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. काका-पुतण्याच्या लढतीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या निलंगा विधानसभा मतदारसंघात यावेळेस काका पुतण्याची लढत दिसणार नाही. अशोक पाटील निलंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रिंगणातून त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळं या मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध अभय साळुंखे अशी दुरंगी लढत होणार आहे. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?


गेल्या वेळच्या निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 32131 मतांनी पराभव केला होता. निलंगा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सुधाकर तुकाराम श्रांगारे यांचा 61881 मतांनी पराभव करून विजय मिळवला.


लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लातूर जिल्हा हा दिग्गज नेतेमंडळींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण, या जिल्ह्याने आत्तापर्यंत राज्याला दोन मुख्यमंत्री दिले आहेत. यामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, अलिकडच्या काळातील लातूर जिल्ह्यातील राजकारण खूप बदललं आहे. राजकीय समीकरण बदलली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. 


महत्वाच्या बातम्या:


विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये कोणाचं वर्चस्व? कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार? सध्याची राजकीय परिस्थिती काय?