Deolali Vidhan Sabha Constituency : देवळाली विधानसभा मतदारसंघात (Dindori Assembly Constituency) महायुतीतून (Mahayuti) दोन उमेदवार देण्यात आल्याने या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire), तर शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव (Rajshree Ahirrao) यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने माजी मंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांचे चिरंजीव योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. मात्र या लढतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सरोज अहिरे यांनी दणदणीत विजय मिळवला. सरोज अहिरे या सलग दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत.
शिवसेनेचा गड अशी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाची ओळख होती. शिवसेनच्या माध्यमातून घोलप कुटुंबीयांनी गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघावर एकहाती आपल वर्चस्व कायम राखले होते. युती सरकारच्या काळात बबनराव घोलप यांच्या माध्यमातून राज्याला सामाजिक न्याय मंत्री आणि मतदारसंघाला लाल दिवा लाभला. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सैनिकांमध्ये बबनराव घोलापंच नाव घेतले जाते. बबनराव सलग पाच वेळा निवडून आले आहेत. दोन वेळा अपक्ष निवडणूक लढविली आहे. बबनराव घोलप यांनी त्यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना 2014 सालच्या निवडणुकीच्या रणांगणात उतरविले. या निवडणुकीत योगेश घोलप यांचा विजय झाला. तर 2019 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांनी शिवसेनेच्या योगेश बबनराव घोलप यांचा 41702 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता.
देवळालीच्या तिरंगी लढतीत सरोज अहिरेंची बाजी
यंदाच्या निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. कारण महायुतीत अजित पवार गटाने विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी विशेष विमानाने एबी फॉर्म पाठवला आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांची उमेदवारी मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजश्री अहिरराव नॉट रिचेबल असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतून सरोज अहिरे आणि राजश्री अहिरराव या दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर महाविकास आघाडीकडून या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र, ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली. शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप यांनी उमेदवारी दिली. आता सरोज अहिरे विरुद्ध राजश्री अहिरराव विरुद्ध योगेश घोलप यांच्या तिरंगी लढत पाहायला मिळाली. मात्र, या मतदारसंघात सरोज अहिरे यांनी विजय मिळवला.
आणखी वाचा