Chhagan Bhujbal On Lok Sabha Election Result 2024 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला जोरदार फटका बसला. महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षावर जोरदार टीका झाली. आरएसएसनेही यावर नाराजी व्यक्त केली होती. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी गणितच मांडले. त्याशिवाय उत्तरप्रदेशचा दाखलाही दिला. पुण्यात भिडे वाड्याची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 


महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसमुळे फटका बसला का ? 


आमच्यामुळे कसा फटका बसलेला असू शकतो? राज्यातील 48 जागामधील आम्हाला 4 जागा दिल्या. चारमधील दोन जागा शिरुरमध्ये शिंदेंचे आढळराव पाटील होते, तर परभणीमध्ये महादेव जानकर यांना उमेदवारी दिली.  खऱ्या अर्थाने आम्हाला फक्त रायगड आणि बारमती  या जागाच मिळाल्या. एका जागी आमचा विजय झाला, दुसऱ्या जागी पराभव झाला. आमच्यामुळे 48 जागांवर परिणाम झाला, असं कसं म्हणू शकता. आम्हाला फक्त दोनच जागा मिळाल्या. त्यातही एक जिंकली.


थोडीफार पिछेहाट झाली आहे, पण फक्त महाराष्ट्रातच झाली का? दुसऱ्या राज्यातही फटका बसलाच आहे ना? उत्तर प्रदेशमध्ये इतका मोठा फटका बसेल, असं कुणीच म्हणत नव्हते. त्यामुळे राज्यात भाजपला फटका बसण्याचं कारण अजित पवार गट असल्याचं म्हणून शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले, असे छगन भुजबळ म्हणाले.  


लोकसभेला नाशिकमधून उमेदवारी न मिळण्यावर स्पष्टच बोलले -


खासदार होण्याची इच्छा असल्यामुळेच नाशिक लोकसभा लढवण्यासाठी तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकिट फायनल केल्याचं सांगितलं गेले, त्यामुळे कामलाा लागलो होतो.  त्यानंतर एक महिना झालं तरी तिकिट जाहीर होईना, म्हणून मी थांबलो. समोरच्या उमेदवारानेही तयारी केली होती. माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली. फॉर्म भरण्याच्या एक दिवस आधी उमेदवारी जाहीर झाली. याचा परिणाम जय पराजयावर होत असतो, असे छगन भुजबळ म्हणाले.  


राज्यसभा उमेदवारी मिळाली नाही, काय म्हणाले...


हो, मी लढण्यासाठी इच्छूक होतो. पण पक्ष म्हटलं की सगळ्याच गोष्टी तुमच्या म्हणाप्रमाणे होत नाही. थांबावं लागतं. आपल्याला वाटतं असं व्हायला हवं, पण होत नाही. त्यासाठी वेगवेगळी कारण असतील. पक्ष म्हणातल्यावर अनेक गोष्टी घडतात पक्षात सगळं काही मनासारखं होत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.


महायुती मागे का पडली ?


महायुती का मागे पडली, याचं विश्लेषण अभ्यास झाला पाहिजे. 400 पार म्हटल्यामुळे संविधानमध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार करण्यात आला. त्यामुळेच पराभव झाला, असे भुजबळांनी सांगितले. 


80 जागांवर आजही कायम - 


विधानसभेच्या 80 जागांच्या दाव्यावर आजही कायम असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. अपक्ष आमदार आणि आमचे आमदार, असे जवळपास 60 जागा आहेत. लढण्यासाठी आम्हाला 15-20 जागा तर मिळतील ना? असे छगन भुजबळ म्हणाले.