पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पहिल्या जाहीर भाषणावरुन अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. भाषणानंतर सोशल मीडियावर थेट त्यांच्या राजकीय कारकीर्दीवरच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र आता पार्थ पवारांनी फेसबुक पोस्टद्वारे ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.


पार्थ पवार लिहितात, "भाषण ही एक कला आहे... भाषणाच्या कलेवर तुम्ही जनतेला काही काळ आपलंसं करु शकता परंतु कायमस्वरुपी आपलंसं करायचे असेल तर ते आपल्या कामातून दाखवून दिले पाहिजे. हे बाळकडू मला लहानपणापासून आमच्या घरातून आदरणीय आजोबा, दादा, सुप्रियाताई आणि आईकडून मिळाले आहे..."



'पार्थ पवार लंबी रेस का घोडा है... याद रखना', नितेश राणेंकडून पाठराखण

पार्थ पवारांच्या रुपाने पवार घराण्याची तिसरी पीढी राजकारणात येत आहे. याआधी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांची अनेक भाषणं लोकांनी ऐकली आणि ती गाजली आहेत. त्यामुळे पार्थ पवार पहिल्या भाषणात लोकांची मनं जिंकण्यात कमी पडल्याची चर्चा झाली.

आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे : पार्थ पवार

पार्थ पवारांचं आत्ताच 'असं' मग खासदार झालेच तर 'कसं'?

पार्थ पवार-श्रीरंग बारणे, दोन प्रतिस्पर्ध्यांचं एकाच वेळी एकाच मंदिरात साकडं

VIDEO | पार्थ पवारांचं यांचं पहिलं भाषण