सोलापूर : माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी संसदीय राजकरणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर माजी आमदार नरसय्या आडम यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, आयुष्यभर सामाजिक आणि चळवळीत काम करणार, निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यापुढे सहभागी होईल, असे त्यांनी म्हटले आहे. 


यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भारतीय जनता पार्टी देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली देण्यात आली. तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली. तर एमआयएमचे फारूक शाब्दी, माकपचे नरसय्या आडम व अपक्ष तौफिक शेख यांच्यात सामना रंगला होता. या निवडणुकीत भाजपचे देवेंद्र कोठे यांनी बाजी मारली. दुसरीकडे माजी आमदार नरसय्या आडम हे सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. आडम मास्तरांचे डिपॉझिट देखील जप्त झाले. यानंतर आता आडम मास्तरांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी संसदीय राजकरणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.  


निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार : नरसय्या आडम  


याबाबत नरसय्या आडम म्हणाले की, आमच्या पक्षात वारसदार नेमण्याची पद्धत नाही. जो चळवळीत पुढे जाईल तोच उमेदवार असेल. सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराने आचारसंहिता भंग केलेला आहे. त्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. आम्ही उच्च न्यायालयात याबाबतीत दाद मागणार आहोत. जर उच्च न्यायालयाने न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागणार आहोत. आयुष्यभर सामाजिक आणि चळवळीत काम करणार आहे. निवडणुकांमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी यापुढे सहभागी होईल, असे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. 


सोलापूर जिल्ह्यात विजयी उमेदवारांची यादी  


1. माढा  - अभिजीत पाटील 
2. करमाळा - नारायण पाटील 
3. पंढरपूर-मंगळवेढा - समाधान अवताडे 
4. सांगोला - बाबासाहेब देशमुख
5. माळशिरस - उत्तम जानकर 
6. मोहोळ - राजू खरे
7. बार्शी - दिलीप सोपल
8. अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
9. सोलापूर मध्य - देवेंद्र कोठे 
10. सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
11. सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख आघाडीवर


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप


Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?