नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपत असताना भाजपची पत्रकार परिषद सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. याचवेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील पत्रकार परिषद सुरु आहे. "पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना आहे", या शब्दात राहुल गांधींनी मोदींच्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच "मोदी जिथे पत्रकार परिषद घेत आहेत, त्या खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला आहे", असा आरोपही केला आहे.
VIDEO :
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- सरकार स्थिर असेल तर आयपीएल, रमजान, शाळांच्या परीक्षा आणि इतर सुरळीत चालतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- देशात हे पहिल्यांदा होणार आहे की, आमचं सरकार पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा सत्तेवर येणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी