Narendra Modi, दिल्ली : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले , बाबासाहेब आंबेडकर , वीर सावरकर , बाळासाहेब ठाकरे अशी महान व्यक्तींच्या धरतीने पूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत. आम्ही वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करणार आहोत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भाजपने महाराष्ट्रात विजय मिळवल्यानंतर पीएम मोदींनी दिल्लीत भाजपच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्राने विकसित भारताचा संकल्प आणखी मजबूत केला. मी देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मी सर्वांचे अभिनंदन देखील करतो. मी एकनाथ शिंदे, माझे मित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे देखील कौतुक करतो.
मध्य प्रदेशने देखील भाजपवर विश्वास दाखवला
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आज देशातील अनेक राज्यात पोटनिवडणुकांचे देखील निकाल आले आहेत. आमची लोकसभेची एक सीट देखील वाढली आहे. युपी, उत्तराखंड आणि राजस्थानने भाजपला जनतेने समर्थन दिलं आहे. मध्य प्रदेशने देखील भाजपवर विश्वास दाखवला आहे. बिहारमध्ये देखील एनडीएचे समर्थन वाढले आहे. हे दाखवतं की देशाला फक्त विकास पाहिजे.
मी महाराष्ट्रातील मतदारांचे , तरुणांचे विशेषत: माता भगिणींचे आभार मानतो. मी शेतकरी-बंधू भगिनींचे देखील आभार मानतो. मी देशातील लोकांचे आभार मानतो. मी झारखंडच्या जनतेचे आभार मानतो. झारखंडच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. यामध्ये भारताचा एक एक कार्यकर्ता प्रयत्न करेन.
मागील 50 वर्षात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला हा सर्वात मोठा विजय आहे. सात वर्षानंतर आणखी एक महत्त्वपूर्ण बाब मी सांगतो. ही लागोपाठ तिसरी वेळ आहे. भाजपच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आशीर्वाद दिले आहेत. भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनला आहे. हे निश्चितरुपाने ऐतिहासिक आहे. हे भाजपसाठी प्रशासनाचे कामावर मोहोर उमटवणारे आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या