Narayan Rane on Uddhav Thackeray, सिंधुदुर्ग : "उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात एखादी शाळा किंवा कॉलेज तरी काढलं आहे का? तर नाही. यांचा सख्खा भाऊ लोणावळ्यात गेला. तेव्हा सांगितलं आम्ही लोणावळ्याला स्मारक बांधणार, हॉस्पिटल बांधणार... बांधलं काय रे?" असा सवाल रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजप खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. ते मालवण येथे बोलत होते.
नारायण राणे म्हणाले, कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी ठेकेदार निघत असताना 15 टक्के कमिशन घेतलं. बाळासाहेबांचा मी शब्द दिलेला, शपथ घेतली, म्हणून उद्धव ठाकरे वाचतो. माझ्यानंतर उद्धव आणि आदित्य काही बोलले तरी काही होणार नाही हा शब्द घेतला. हा माणूस साहेबांमुळे वाचतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गरिबांना पाच किलो धान्य दिलं का? मोदींनी देशातील अनेक कुटुंबांना अन्न धान्य दिलं, असंही नारायण राणे म्हणाले.
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, ते म्हणतात आता लाडकी बहीण योजना यांना आठवली म्हणतात, त्यांनी अशी योजना सुरू केली का? मी वैभववाडी ते कोल्हापूर असा रेल्वे मार्ग सुरू करणार आहे. आपलं इथेही चालत आणि दिल्लीत चालत. उद्धव ठाकरे यांना तोंडावर सांगितलं विनायक राऊत हे हाप्तेखोर आहेत. सरकारच्या योजना लोकांपर्यत पोचवा हे सांगताना नारायण राणेंनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, साहेबांचं शिवाजी पार्कवरचं स्मारक पाहा. तुम्हाला होत नाही तर सांगा आम्ही बांधू. ही शिवसेना काहीही करु शकत नाही. मला मुख्यमंत्री करा, म्हणतात. एकनाथ शिंदेंनी सुरु केलेले लाडकी बहीण बंद करणार म्हणतो. तू दुसरं काय करणार? आज लाडकी बहीण योजनेमुळे गावागावात महिला ओवाळत आहेत. शिंदे साहेबांचे आभार मानतात. आमच्या कुटुंबात एवढे पैसे येतात, आधार होतो, म्हणतात.
घर चालत नाही आम्हाला माहिता आहे, पण दानत तरी दाखवली. शरद पवार चार वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. परत आपलं सरकार आलं तर आपल्याला विकास करता येईल. आज लोक प्रचाराला येत आहेत, कौतुक करतात वाह...हायवे झाला म्हणून...मोपाही आहे आणि चिपी देखील आहे. रेल्वे पाहा...रेल्वे मंत्र्यांनी फोन केला, त्यांना कोल्हापूर आणि रत्नागिरी जोडून द्या म्हटलं. हे आम्ही करतोय.
इतर महत्त्वाच्या बातम्या