Murbad Vidhan Sabha Election 2024 : मुरबाड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सुभाष पवार यांना तिकीट दिलं आहे. तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून भाजपने किसन कथोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. भाजपने किसन कथोरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. याआधी दोन टर्ममध्ये किसन कथोरे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. किसन कथोरे यांना गड राखण्याचं मोठं आव्हान आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांच्या उमेदवाराला मतदार सहानुभूती दाखवणार की, किसन कथोरेचं पुन्हा बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघ


मुरबाड विधानसभा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातील 18 मतदारसंघांपैकी एक आहे. मुरबाड मतदारसंघात मुरबाड तालुका आणि कल्याण तालुक्याच्या काही भागांचा समावेश आहे. मुरबाड शहर, त्याच्या शेजारच्या गावांसह, मुरबाड नगर पंचायत, कर्जत आणि कल्याण, आसपासच्या शहरी भागातील बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवली यांचा या मतदारसंघात समावेश होतो. मुरबाड हे MIDC म्हणजेच 'महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' या नावानं ओळखलं जाणारे खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही उद्योग असलेले एक महत्त्वाचं औद्योगिक शहर आहे. 2001 च्या भारतीय जनगणनेनुसार, मुरबाडची लोकसंख्या अंदाजे 15,823 होती, ज्यामध्ये 54 टक्के पुरुष आणि 46 टक्के स्त्रिया असं प्रमाण आहे.

 

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार किसन शंकर कथोरे यांनी 1,74,068 मतांनी विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे प्रमोद विनायक हिंदुराव यांना 38,028 मते मिळाली. मागील 2014 च्या निवडणुकीत भाजपचे किसन शंकर कथोरे यांनी 85,543 मते मिळवून विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादीचे गोटीराम पदू पवार यांना 59,313 मते मिळाली होती.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती



  • सुभाष पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)

  • किसन कथोरे (भाजप)


मुरबाड विधानसभा निकाल 2019



  • किसन कथोरे (भाजप) - 1,74,068 मते (विजयी) 

  • प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी काँग्रेस) - 38,028 मते 


मुरबाड विधानसभा निकाल 2014



  • किसन कथोरे (भाजप) - 85,543 मते (विजयी)

  • गोटीराम पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) - 59,313 मते


महत्त्वाच्या इतर बातम्या :