Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विदर्भातील (Maharashtra Vidharbha Exit Poll) तब्बल 41 मतदार संघात 2019 च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे विदर्भातील मतदानाचा वाढलेला टक्का नेमका कोणाला फायदेशीर ठरेल अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये विदर्भातील 62 पैकी 50 मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली होती. (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024)


2019 चे तुलनेत 2024 च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढलेले विदर्भातील मतदारसंघ - 


चिखली, मेहकर, जळगाव जामोद, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मुर्तीजापुर, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा, उमरेड, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, कामठी, रामटेक, गोंदिया, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, वरोरा, वणी, राळेगाव, यवतमाळ, आर्णी, पुसद, उमरखेड


2019 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी झालेले विदर्भातील मतदारसंघ -


मलकापूर, बुलढाणा, सिंदखेड राजा, खामगाव, अकोट, बाळापुर, रिसोड, वाशिम, कारंजा, काटोल, सावनेर, हिंगणा, तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, आमगाव, राजुरा आणि दिग्रस...


दरम्यान विदर्भातील मतदान वाढलेल्या 41 मतदारसंघात 30 मतदारसंघ असेही आहे, जिथे मतदानाची टक्केवारी फक्त 2019 च्या तुलनेतच नव्हे, तर 2014 च्या तुलनेतही वाढली आहे. विशेष म्हणजे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये तब्बल 50 मतदारसंघात विदर्भात मतदानाची टक्केवारी घसरली होती.. मात्र यंदा वैदर्भीय मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे 41 मतदारसंघात 2019 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे.


यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत.  (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024) विविध संस्थांच्या या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदा नागपूर, विदर्भासह कोण बाजी महाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, सर्व एक्झिट पोलचे आकडेवारी आपण जाणून घेऊ.


सर्व एक्झिट पोलची आकडेवारी  


लोकशाही रुद्र एक्झिट पोलची आकडेवारी-  


विदर्भ - (एकूण जागा 62)
भाजप - 23
शिवसेना (शिंदे गट) - 04
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
काँग्रेस - 21
शिवसेना (ठाकरे गट ) 04
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 04  


ZEE AI POLL एक्झिट पोलची आकडेवारी-  


विदर्भ (एकूण जागा 62 )
महायुती 32-37
मविआ 24-29
इतर  0-2


SAS GROUP HYDRABAD एक्झिट पोलची आकडेवारी-  


विदर्भ (एकूण जागा 62)
मविआ 33-35
महायुती 26-27
इतर 2-3


संबंधित बातमी:


Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?