Bhiwandi West Vidhan Sabha Election 2024 : भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली. यामध्ये महेश चौगुले यांनी विजय मिळवला. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश चौघुले यांनी काँग्रेसच्या दयानंद चोरगे यांचा पराभव केला. महेश चौगुले सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत महेश चौघुले हे भाजपच्या तिकीटावर सलग दोन वेळा निवडून आले होते. भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि त्यांनी गड राखला.


महेश चौगुले यांची सलग तिसऱ्यांदा बाजी


भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीच्या पारंपरिक जागा वाटपात शिवसेनेच्या ताब्यात होता. 2014 साली दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि मोदी लाटेत ही जागा भाजपने जिंकली. या ठिकाणाहून भाजपचे महेश चौगुले निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीने आपापले तगडे उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण, भाजपचे महेश चौगुले 42,483 मते घेऊन विजयी झाले. 2019 मध्येही भाजपच्या तिकीटावर महेश चौघुले 58857 मतांनी विजयी झाले.


भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ


2009 च्या मतदारसंघाच्या फेररचनेनंतर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली, त्यावेळी भिवंडीचे विधानसभेचे पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण असे भाग झाले. हा मतदारसंघ समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा गड मानला जातो. भिवंडी पश्चिम मतदारसंघात बहुभाषिक आणि मुस्लिम मतदार सर्वाधिक आहे. 2014 च्या निवडणुकीत भिवंडी पश्चिम मतदारसंघावर भाजपने झंडा रोवला. 1990 पासून समाजवादी पक्षाचा गड राहिलेला भिवंडी विधानसभा मतदारसंघ 2014 साली भाजपच्या ताब्यात गेला. आतापर्यंत भिवंडी मतदारसंघात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. 1990 नंतर एकदा शिवसेना सोडल्यास आजवर इथे समाजवादी पार्टी आणि नंतर काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे.


भौगोलिक रचना


भिवंडी पश्चिम मतदारसंघात भिवंडी शहरासह गावाचाही समावेश होतो. यामध्ये 40 टक्के मतदार हा मुस्लिम आहे तर उर्वरित मतदार हा हिंदू असून आगरी, गुजराती, राजस्थानी, जैन, तेलुगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणचा इतिहास पाहता आजपर्यंत भिवंडीतल्या निवडणुका या थेटपणे हिंदू-मुस्लिम अशाच झालेल्या आहेत.


मतदारसंघातील समस्या


भिवंडी उद्योग शहर म्हणून नामांकित आहे, पण हीच याची कमजोरी ठरत आहे. येथील असंघटीत उद्योग, त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसणं ही मोठी समस्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील बिझनेस पार्कची मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. सोबतच रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी पासून सुटका करण्यात नेतृत्व अपयशी ठरलं असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.


भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती



  • महेश चौघुले, भाजप - विजयी

  • दयानंद चोरगे, काँग्रेस


भिवंडी पश्चिम विधानसभा 2019 चा निकाल



  • महेश चौघुले (भाजप) - 58857 मते (विजयी)

  • गुड्डू खालिद (काँग्रेस) - 43945 मते


भिवंडी पश्चिम विधानसभा 2014 चा निकाल



  • महेश चौघुले (भाजप) - 42483 मते (विजयी)

  • अश्फाक शोएब खान (काँग्रेस) - 39157 मते


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bhiwandi East Vidhan Sabha : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ : रईस शेख 'बादशाह' ठरणार की, संतोष शेट्टी बाजी मारणार?