मुंबई : देशातील धनदांडग्यांचं शहर असलेल्या, देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) यंदाही मतदानाचा टक्का अपक्षेप्रमाणे कमीच झाल्याचं दिसून येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई शहर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील दहा विधानसभा (Vidhansabha) मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी एकूण 52.69 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे, गर्भश्रीमंतांच्या मुंबईत मतदानाचा (Voting) टक्का गरिबी असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात एकूण सरासरी 65.10 टक्के मतदान झालं असताना मुंबईतील हे मतदान विचार करण्यास भाग पाडणारं आहे. विशेष म्हणजे, गर्भश्रीमंत नेते आणि मंंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हायप्रोफाईल मतदारसंघातही केवळ 52.53 टक्के मतदान झालं आहे. तर, मुंबईतील सर्वात कमी मतदान हे कुलाबा मतदारसंघात 44.44 टक्के एवढं आहे.


जिल्ह्यात एकूण 25 लाख 41 हजार 810 मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 13 लाख 39 हजार 299 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 10 हजार 174, स्त्री मतदार 6 लाख 29 हजार 049 तर इतर 76 मतदाराने मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी 52.69 टक्के आहे. 


विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे
    
१७८ - धारावी विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ३१ हजार  ०२० मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार  ७१  हजार १७६,  स्त्री मतदार  ५९  हजार ८३२ तर इतर १२ मतदाराने मतदान केलेले आहे. ( ५०.०३%).


१७९- सायन कोळीवाडा, विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ५१ हजार ७११ मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार  ८२  हजार ३८३, स्त्री मतदार ६९ हजार ३१४ तर इतर १४ मतदाराने मतदान केलेले आहे. (५३.५६%).


१८० - वडाळा विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख १८ हजार ४४५ मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार  ६१  हजार ३९६ , स्त्री मतदार  लाख ५७  हजार ०४८ तर इतर १ मतदाराने मतदान केलेले आहे. (५७.६७%).


१८१- माहीम विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ३३ हजार ३४३ मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार   ६७ हजार ३५२ ,स्त्री मतदार ६५ हजार ९६४  तर इतर २७  मतदाराने मतदान केलेले आहे. (५९.०१%).


१८२ - वरळी विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ४१ हजार ५८५ मतदारांनी मतदान केले.पुरुष मतदार    ७५ हजार ६९९ ,स्त्री मतदार  ६५  हजार ८८२ तर इतर ४ मतदाराने मतदान केलेले आहे. (५३.५३%).


१८३ - शिवडी विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ५२ हजार  ८८० मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार  ८० हजार ८४८ ,स्त्री मतदार  ७२ हजार  ०२८ तर इतर ४ मतदाराने मतदान केलेले आहे. (५५.५२%).


१८४- भायखळा विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ३७ हजार  २४४ मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार  ७२ हजार ५७६, स्त्री मतदार  ६४ हजार ६६५  तर इतर ३ मतदाराने मतदान केलेले आहे. (५३.०२%).


१८५ - मलबार हिल विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ३७ हजार १९५ मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार  ७१ हजार ३४९ ,स्त्री मतदार  ६५ हजार ८४४  तर इतर २ मतदाराने मतदान केलेले आहे. (५२.५३%).


१८६- मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख १७ हजार  ९८६ मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार ६३ हजार ५६८ ,स्त्री मतदार  ५४ हजार ४१४ तर इतर ४ मतदाराने मतदान केलेले आहे. (४८.७६%).


१८७ - कुलाबा विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख १७ हजार  ८९० मतदारांनी मतदान केले. पुरुष मतदार ६३ हजार ८२७, स्त्री मतदार  ५४ हजार ०५८ तर इतर ५ मतदाराने मतदान केलेले आहे. (४४.४४ %)


हेही वाचा


SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा