मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी एकूण 4140 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये मुंबई उपनगर परिसरातील 26 मतदारसंघांचा समावेश आहे. या 26 मतदारसंघांमधून  एकूण 315 रिंगणात उतरले आहेत. मुंबई उपनगर परिसरातील लढती या आगामी राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. जो पक्ष मुंबई उपनगर परिसरातील जास्तीत जास्त जागा जिंकेल, त्या पक्षाचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा राहतील. यादृष्टीने मुंबई उपनगर परिसरातील 26 मतदारसंघाचा निकाल हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.  मुंबई उपनगरात 2019 मध्ये भाजपचे 12, शिवसेनेचे 9, काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता. 

मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघातील प्रमुख लढती

विधानसभा मतदारसंघमहायुती उमेदवारमविआ उमेदवारवंचित मनसे अपक्ष इतर
 बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)संजय भोसले (ठाकरे गट)कुणाल माईणकर (मनसे)
  दहीसरमनीषा चौधरी (भाजप)विनोद घोसाळकर (ठाकरे गट)महेश फरकासे (मनसे)
मागाठाणेप्रकाश सुर्वे (शिंदे गट)उदेश पाटेकर (ठाकरे गट)विकास शिरसाट (वंचित)
कांदिवलीअतुल भातखळकर (भाजप)कालू बुधेलिया (काँग्रेस)दिनेश साळवी (मनसे)
चारकोपयोगेश सागर (भाजप) यशवंत सिंग (काँग्रेस)दिलीप लिंगायत (वंचित)
मालाडविनोद शेलार (भाजप)अस्लम शेख (काँग्रेस)अजय रोकडे (वंचित)
जोगेश्वरी पूर्वनीशा वायकर (शिंदे गट) अनंत (बाळा) नर (ठाकरे गट) परमेश्वर रणशूर (वंचित)
दिंडोशीसंजय निरुपम (शिंदे गट)सुनील प्रभू (ठाकरे गट)भास्कर परब (मनसे)
गोरेगाव   
वर्सोवाभारती लव्हेकर (भाजप)हारुन खान (ठाकरे गट)  संदेश देसाई (मनसे)
अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)पतीतपावन नित्य (बसपा)
अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिंदे गट)ऋतुजा लटके (ठाकरे गट)संजीव कुमार कलकोरी (वंचित)
मुलुंडमिहीर कोटेचा (भाजप)संगीता वाजे (शरद पवार गट)प्रदीप शिरसाट (वंचित)
विक्रोळीसुवर्णा करंजे (शिंदे गट)सुनील राऊत (ठाकरे गट)विश्वजित ढोलम
भांडुप पश्चिमअशोक पाटील (शिंदे गट)रमेश कोरगावकर (ठाकरे गट)शिरीष सावंत (मनसे)
घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप)संजय भालेराव (ठाकरे गट)गणेश चुक्कल (मनसे)
घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)राखी जाधव (शरद पवार गट)संदीप कुलथे (मनसे)
मानखुर्द शिवाजीनगरनवाब मलिक (अजित पवार गट) सुरेश (बुलेट) पाटील (शिंदे गट)अबू आझमी (सपा)जगदीश खांडेकर (मनसे)
विलेपार्लेपराग अळवणी (भाजप)संदीप नाईक (ठाकरे गट)जुईली शेंडे (मनसे)
चांदिवलीदिलीप लांडे (शिंदे गट)नसीम खान (काँग्रेस)महेंद्र भानुशाली
कुर्लामंगेश कुडाळकर (शिंदे गट)प्रविणा मोराजकर (ठाकरे गट)प्रदीप वाघमारे (मनसे)
कलिनाअमरजित सिंग (भाजप)संजय पोतनीस (ठाकरे गट)संदीप हुटगी (मनसे)
वांद्रे पूर्वझिशान सिद्दीकी ( अजित पवार गट)वरुण सरदेसाई (ठाकरे गट)तृप्ती सावंत (मनसे)
वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)असीफ झकेरिया (काँग्रेस)अजीज कुरेशी (बसपा)
अणुशक्तीनगरसना मलिक (अजित पवार गट)फहाद अहमद (शरद पवार गट) 
चेंबुरतुकाराम काते (शिंदे गट)प्रकाश फातर्फेकर (ठाकरे गट)माऊली थोरवे (मनसे)