Aishwarya Rai Abhishek Bacchan: मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं.  या चर्चा थांबतात ना थांबतात तोच अभिषेक बच्चन हा त्याच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे एका नव्या सिनेमात एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मणिरत्नमच्या गुरु चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर आता हे दोघं मणिरत्न यांच्या कथेत हिंदी फिल्ममध्ये दिसू शकतात असं सांगितलं जात आहे. बॉलीवूड ला अनेक उत्कृष्ट सिनेमे देणारे फिल्म मेकर मणीरत्नम सध्या एका नवीन हिंदी चित्रपटाचे प्लॅनिंग करत असल्याचे सांगितलं जात आहे. 


2007 मध्ये आलेली मणीरत्न यांची गुरु ही फिल्म ऐश्वर्या आणि अभिषेकच्या केमिस्ट्रीने चर्चेत आली होती. त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातल्यानंतर मनिरत्न यांनी रावण चित्रपटातही या दोघांना पुन्हा एकदा कास्ट केलं होतं. टाइम्स नाव चा रिपोर्टनुसार, निर्माते मणीरत्न त्यांच्या नव्या चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याला पुन्हा एकदा कास्ट करू शकतात. असं झालं तर मनिरत्न यांच्यासोबत ऐश्वर्या आणि अभिषेक यांची ही तिसरी फिल्म असेल. याबाबत अध्यापक कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी मनीरत्न यांना अभिषेक आणि ऐश्वर्याला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी एक आकर्षक कथा सापडल्याचे सांगितलं जात आहे.


मनिरत्नम यांच्यासोबत अभिषेक ला करायचं होतं काम 


अभिनेता अभिषेक बच्चन याला मणिरत्नम यांच्यासोबत काम करायचं होतं. अभिषेकला जर मणिरत्नम यांनी कास्ट केलं तर अभिषेकची त्यांच्यासोबतची ही चौथी फिल्म असेल. यादी युवा आणि जब वो पहली बार मुझे चित्रपटात देखील अभिषेकने मणिरत्न यांच्यासोबत काम केलं होतं. 


मणिरत्न यांच्यासोबत काम करणं ही अभिषेक साठी कायमच गर्वाची बाब राहिली आहे. त्याने जाहीरपणे ही असं अनेकदा सांगितलं आहे. जेव्हा मला कळलं की मनिरत्न मला कास्ट करू इच्छितात तेव्हा मी खूप खुश होतो. कोणताही अभिनेता मणिरत्न यांच्यासोबत काम करण्यासाठी त्याचा सर्वस्व पणाला लावेल. त्यांनी तीन वेळा मला चित्रपटात घेण्यासाठी लायक समजलं याचा मला गर्व वाटतो असं अभिषेक म्हणाला होता. 


घटस्फोटाच्या चर्चांना ब्रेक


ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अभिषेक ऐश्वर्या मध्ये काहीतरी बिनसल्याची किंवा अभिषेकच्या अफेअरची अफवा असल्याचं आता वेळोवेळी त्यांच्या वक्तव्यातून आणि कृतीतून समोर येत आहे. त्यामुळे आता ऐश्वर्या आणि अभिषेक च्या घटस्फोटांच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.