BMC Election 2022: राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. त्यात मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकींचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं नवीन प्रभागरचनेचा आराखडा आज (शुक्रवारी, 21 जानेवारी) राज्य निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात आलाय. तसेच 9 वाढीव वार्डची यादीही सादर करण्यात आलीय. मुंबईतील वार्ड संख्या 326 झाल्यानं निवडणुकीतील जागांचे समीकरणही बदलण्याची शक्यता आहे.


मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलंय. शहरातील 2011 च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या 11 वर्षांच्या काळात वाढलेल्या  नव्या इमारती, वस्त्या, आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन वॉर्ड पुर्नरचनेचा निर्णय करण्यात आलाय. मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान 3 वॉर्ड वाढवल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालीय. त्यानुसार, शहरभागात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे. तर, पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे आणि पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात वॉर्ड वाढवले जाऊ शकतात. 


कोरोना महामारीमुळं अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र, मुंबई महापालिकेची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळं त्यावेळीच निवडणूक होणं अपेक्षित आहेत. पण सध्याची कोरोनाची स्थिती आणि तिसरी लाट पाहता निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकला होता. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी शिवसेनेनं 97 जिंकल्या होत्या. तर, भाजपला 83 जागा मिळाल्या होता. याशिवाय, राष्ट्रवादी-29, समाजवादी पक्ष- 8 जागा, मनसे- 1 जागा, एमआयएम- 1 आणि अभासे-1 जागा मिळाली होती. मात्र, या निवडणुकीत वार्ड वाढवण्यात आल्यानं समीकरणं बदलण्याची शक्यता दर्शवली जात आहे. 
 
हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha