पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा आणि भाजपच्या राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत झाली होती. यात राजेंद्र गावित यांचा विजय झाला होता. मात्र शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर पालघरची जागा शिवसेनेच्या खात्यात आली. त्यामुळे या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन खल सुरु होतं. अखेर राजेंद्र गावितांना शिवसेनेकडून तिकीट देण्याचा निर्णय झाला.
VIDEO | खासदार राजेंद्र गावित शिवसेनेत, पालघरमधून लोकसभा निवडणूक लढवणार | एबीपी माझा
दुसरीकडे लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छुक असलेले श्रीनिवास वनगा यांची बोळवण झाल्याचं दिसतं. वनगांना विधीमंडळात पाठवणार असल्याचं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.
याविषयी ते म्हणाले की, "श्रीनिवासला संसदेत पाठवायचं आहे हा शब्द मला लक्षात आहे. श्रीनिवासला विधीमंडळात कसं पाठवायचं ते मी बघेन, तो माझा शब्द आहे. त्यानंतर मी त्याला लोकसभेसाठी पाठवेन. युती झाली आहे, गावित चांगलं काम करत आहेत. युती अधिक घट्ट होईल."
तर मी स्वत: निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार बनून भविष्यात काम करण्याचा विचार आहे, असं श्रीनिवास वनगा यांनी सांगितलं.
VIDEO | शिवसेनेकडून राजेंद्र गावितांना पालघरची उमेदवारी, वनगांना आमदारकीचं आश्वासन | मुंबई | एबीपी माझा